ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग इत्यादींच्या संदर्भात लिखाण करणा-या ऋषींची नावे सहस्रो वर्षे लोकांच्या लक्षात राहणे 

कुटुंबातील आई-वडील, आजोबा, आजी यांची नावे २ – ३ पिढ्यांपर्यंतच कुटुंबाच्या लक्षात रहातात. समाजात वावरणार्‍या संतांची नावे २ -३ पिढ्यांपर्यंत समाजाच्या लक्षात रहातात. अभंग इत्यादी लिखाण करणार्‍या संतांची नावे काही शतके समाजाच्या लक्षात रहातात. ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग इत्यादींच्या संदर्भात लिखाण करणार्‍या ऋषींची नावे सहस्रो वर्षे लोकांच्या लक्षात असतात. याउलट आयुष्यभर अहंभावाने वागणार्‍या राजकारण्यांना लोक काही वर्षांतच विसरतात !’