साधना कुणाची होते ?

जे साधक ध्येय निश्चित करून स्वतःकडून झालेल्या चुका स्वीकारतात, स्वतःच्या चुका लक्षात आल्यावर इतरांचे साहाय्य घेतात आणि इतरांच्या चुका लक्षात आल्यावर त्यांनाही साहाय्य करतात, त्या साधकांची साधना होत असते. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

आदर्श साधक कुणाला म्हणावे ?

जे साधक ईश्वरप्राप्तीच्या ध्येयासाठी मायेचा त्याग करायला सिद्ध आहेत, स्थुलातून शरीर अर्पण करत आहेत, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून मन समर्पित करण्याचा प्रयत्न करत आहेत, दुर्बुद्धीचा त्याग करून स्वतःचे तन, मन, बुद्धी अन् अहं अर्पण करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते ‘आदर्श साधक’ आहेत. – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

ईश्वराने मनुष्याला बनवतांना रचलेली लीला !

ईश्‍वराने मनुष्याला बनवतांना स्वतःचा एक अंश घालून (ईश्‍वरी अंश = आत्मा) आणि लीला रचण्यासाठी त्या आत्म्याभोवती मायेचे (त्रिगुणाचे) आवरण घातलेे. मनुष्य म्हणजे र्ईश्‍वरी अंश + माया. त्याने मनुष्याला त्याच्या आत्म्याभोवती असलेले मायेचे आवरण दूर करून ईश्‍वरस्वरूप (आत्मस्वरूप) हो, असे ध्येय दिले. मनुष्य ईश्‍वरस्वरूप झाल्यावर त्या जिवाची लीला पूर्ण होतेे. सर्व मानव ईश्‍वरस्वरूप झाल्यावर जगत्लीला पूर्ण … Read more

प्रश्‍न : भावाच्या पुढे कसे जायचे ?

भावाच्या पुढे अव्यक्त भाव असतो. गुरूंचे रूप समोर असतांना त्यांच्याप्रती भाव ठेवून कार्य करणे, हा ‘व्यक्त भाव’. गुरूंचे रूप समोर नसतांनाही त्याची अनुभूती घेत कार्य करणे, म्हणजे ‘अव्यक्त भाव’. हाच भावाच्या पुढच्या टप्प्याला जाण्याचा मार्ग आहे.

प.पू. डॉक्टरांच्या ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक आहे, ते ते ईश्‍वर देईल, या वाक्याची आलेली प्रचीती !

प.पू. डॉक्टरांच्या ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक आहे, ते ते ईश्‍वर देईल, या वाक्याची आलेली प्रचीती ! तमिळनाडू येथे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा ५० सहस्रांपेक्षा अधिक लोक भोजन भंडार्‍यासाठी आले होते. त्यासाठी किमान ७० ते ८० लक्ष रुपये व्यय आला होता; परंतु पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी … Read more

आता धर्ममार्तंडांनी तीर्थक्षेत्रे आणि मठ-मंदिरे येथून धर्मशुद्धीकरणाला प्रारंभ करणे, ही काळाची आवश्यकता !

आता धर्ममार्तंडांनी तीर्थक्षेत्रे आणि मठ-मंदिरे येथून धर्मशुद्धीकरणाला प्रारंभ करणे, ही काळाची आवश्यकता ! १. संत किंवा मठाधीश यांना चांगले उत्तराधिकारी न मिळणे आणि बहुतांश संतांकडे किंवा मठांमध्ये संपत्तीच्या लालसेमुळे वेतनधारी साहाय्यकांमध्ये संघर्ष चालू असणे : मी धर्मप्रसारानिमित्त अनेक संत आणि मठाधीश यांना भेटतो. तेव्हा ते सर्व जण सांगतात, तुमचे साधक आम्हाला सेवेसाठी द्या. आम्ही चांगले … Read more

सनातन धर्मातील भविष्य लिखाण आणि अन्य धर्मीय तथा राष्ट्रे यांचे इतिहास लिखाण यांतील भेद !

सनातन धर्मातील भविष्य लिखाण आणि अन्य धर्मीय तथा राष्ट्रे यांचे इतिहास लिखाण यांतील भेद ! १. ऋषींनी सांगितलेले सनातन धर्माचे (हिंदु धर्माचे) भविष्य, जे पुढे इतिहास झाले ! अ. वेद, चारही युगांविषयी, तसेच वाल्मीकिऋषींनी लिहिलेले रामायण असो, महर्षि व्यासांनी लिहिलेले महाभारत असो किंवा वर्तमानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २०२३ या वर्षी येऊ घातलेल्या हिंदु … Read more