हिंदु धर्माचे अद्वितीयत्व !
‘कुठे परधर्मियांवर कुरघोडी करून त्यांच्यावर राज्य करण्याची शिकवण देणारे काही पंथ, तर कुठे ‘सर्वेषाम् अविरोधेण् ।’, अशासारखी सहिष्णुतावादी शिकवण देणारा महान हिंदु धर्म !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कुठे परधर्मियांवर कुरघोडी करून त्यांच्यावर राज्य करण्याची शिकवण देणारे काही पंथ, तर कुठे ‘सर्वेषाम् अविरोधेण् ।’, अशासारखी सहिष्णुतावादी शिकवण देणारा महान हिंदु धर्म !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘साधनेमध्ये मनाच्या स्तरावर होणारी अयोग्य विचारप्रक्रिया ही अधिक बाधक असते. अंतर्मुखतेच्या अभावामुळे साधकाला स्वतःच्या चुका कळत नाहीत आणि त्या मनाच्या स्तरावरील चुका असल्यामुळे इतरांच्या लक्षात येत नाहीत. ही विचारप्रक्रिया अयोग्य कृतीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. त्यामुळे या अयोग्य कृतीची जाणीव संबंधिताला करून दिल्यास त्याला त्याच्या अयोग्य विचारप्रक्रियेची जाणीव होण्यास साहाय्य होते, उदा. एका साधकाच्या मनातील … Read more
तुम्ही स्वतःचा विकास करण्याकरता प्रयत्न करत आहात; पण तुम्ही आध्यात्मिकरित्या विकसित व्हा; कारण आध्यात्मिक विकास, हाच समर्पक विकास आहे. तुम्ही अमेरिकन आणि युरोपियन यांची नक्कल करू नका. इंद्रियतृप्तीच्या (वासनेच्या) पायावर आधारलेली अशी संस्कृती टिकत नाही. मानवी जीवनाचा खरा दृष्टीकोन म्हणजे आध्यात्मिक दृष्टीकोन आहे आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करा.’ (साभार : आत्मसाक्षात्काराचे विज्ञान)
‘शास्त्रज्ञ देवाचा शोध घेण्याऐवजी देवाने बनवलेल्या विश्वाचा पिढ्यान्पिढ्या शोध घेत बसतात. याउलट साधक देवाचा शोध घेतात. देव सापडल्यावर त्यांना विश्वाचे कोडे उलगडते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय जगातील कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही; म्हणूनच हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय होणे शक्य नाही. यासाठी हिंदूंनो, साधना करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘एखाद्या व्यक्तीचे प्रारब्ध पालटणे जवळजवळ अशक्य असते. पालटायचेच झाले, तर तीव्र साधना करावी लागते. असे असतांना भारताचे प्रारब्ध शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर प्रयत्न केल्यास पालटणे शक्य आहे का ? त्याला आध्यात्मिक स्तराचेच उपाय, म्हणजे साधनेचे बळ हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भावी पिढी आतंकवादी निर्माण होऊ नये; म्हणून शाळेतील अभ्यासक्रमातच हिंदु धर्मात सांगितलेले ज्ञान, विज्ञान, तसेच चांगले संस्कार करणार्या गोष्टींची शिकवण दिल्यास मुलांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘रामायण, महाभारत किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र नुसते वाचण्यापेक्षा त्यांतील घटनांकडून स्फूर्ती घेऊन सनातन धर्माचे रक्षण करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘साधनेसाठी पैसा, वेळ आदींच्या त्यागापेक्षा ‘मी’पणाचा त्याग, हा खरा त्याग आहे. ‘मी’पणाचा त्याग म्हणजे, ‘मी’, ‘माझे’, ‘स्वकेंद्रित वृत्ती’ आदींचा त्याग. यासाठी गुरु किंवा देव यांना प्रार्थना करावी, ‘दिवसभरातील प्रत्येक प्रसंगात मला माझ्या ‘मी’पणाची जाणीव होऊन तो दूर करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होवोत.’ यानुसार केलेल्या प्रयत्नांचा आढावा प्रतिदिन देवाला द्यावा.’ – (पू.) संदीप आळशी (१४.१२.२०२२)
‘आपल्या मुलाचे पुढे कसे होणार ?’, ही काळजी त्याच्या आई-वडिलांना असते. याउलट ʻराष्ट्रातील सर्वजण आपलीच मुले आहेत’, या व्यापक भावामुळे संत नेहमी आनंदी असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले