तक्रार नको, तर अंतर्मुख होऊन कारण शोधा !

‘अनेक जण ‘त्‍याची प्रगती होते; पण माझी प्रगती होत नाही’, अशी तक्रार करतात. खरे तर येथे ‘माझ्‍यामध्‍ये काय कमी आहे की, ज्‍यामुळे माझी प्रगती होत नाही ?’, याचा विचार करणे आवश्‍यक असते.’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१.५.२०२३)

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना स्‍थुलापेक्षा सूक्ष्मातून अनुभवण्‍याचा लाभ

‘जे साधक स्‍थुलातून माझ्‍याकडे पहातात, त्‍यांना मी काही घंटेच त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवास येते. जे साधक मला सूक्ष्मातून अनुभवण्‍याचा प्रयत्न करतात, त्‍यांना मी २४ घंटे त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवता येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

ईश्वरी कायदे आणि जमाखर्च यांचे महत्त्व !

‘पृथ्वीवरील कायदे आणि जमाखर्च इत्यादी सर्व व्यर्थ आहेत. शेवटी प्रत्येकाला ईश्वरी कायदे आणि जमाखर्च इत्यादींना सामोरे जावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

यज्ञाला विरोध करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

‘बुद्धीप्रामाण्यवादी यज्ञात आहुती देण्यात येणार्‍या वस्तूंच्या संदर्भात म्हणतात, ‘त्या वस्तू यज्ञात जाळता कशाला ?’ असे म्हणणे हे ‘इंजेक्शन देऊन एखाद्याला वेदना का देता ?’, असे म्हणण्यासारखे आहे. इंजेक्शनमुळे जसे लाभ होतात, तसेच यज्ञात आहुती दिल्यामुळे होतात, हे त्यांना अभ्यासाच्या अभावी कळत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शिकण्याच्या वृत्तीचा लाभ !

‘प्रत्येक चुकीतून काहीतरी शिकता आले, तर चुकीमुळे दुःख न होता, शिकण्याचा आनंद मिळतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

फळाची अपेक्षा न ठेवता प्रयत्नांची पराकाष्ठा करा !

‘क्रियमाणकर्माचा पूर्ण वापर करून प्रयत्नांची पराकाष्ठा करा; पण फलनिष्पत्ती प्रारब्धावर किंवा देवावर सोडा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेला आरंभ केल्‍यावर ईश्‍वराला जाणून घ्‍यायची जिज्ञासा असेल, तर प्रथम स्‍वतःला जाणा !

‘साधनेला आरंभ केला की, कुणालाही ईश्‍वराला पहायची, त्‍याला जाणून घ्‍यायची ओढ लागते; पण आपण स्‍वतः स्‍वभावदोष आणि अहंकार यांनी मलीन असतांना आपल्‍याला शुद्ध आणि पवित्र असा ईश्‍वर कसा भेटेल ! ईश्‍वराला जाणून घ्‍यायचे असेल, तर आधी अंतर्मुख होऊन स्‍वतःला जाणले पाहिजे. ‘आपल्‍यात कोणते स्‍वभावदोष आणि अहंचे कोणते पैलू आहेत ?, तसेच आपल्‍यात कोणते गुण वाढवणे … Read more

केवळ अध्‍यात्‍माचा अभ्‍यास नको, तर प्रत्‍यक्ष साधना करणे महत्त्वाचे !

‘अध्‍यात्‍माच्‍या अभ्‍यासाने केवळ अध्‍यात्‍माचे शाब्‍द़िक ज्ञान होते. थोडक्‍यात त्‍यामुळे केवळ पांडित्‍य येते. तेे दैनंदिन जीवनात आचरणात आणणे कठीण असते. याउलट साधना केल्‍यास खर्‍या अर्थाने अध्‍यात्‍म जगणे होते. त्‍याने याच जन्‍मातही ईश्‍वरप्राप्‍ती करता येते.’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.५.२०२३)

ज्ञान आणि अज्ञान यांतील भेद

‘जे शाश्वताविषयी सांगते, ते सर्व ‘ज्ञान’ आहे. ज्याने ईश्वरप्राप्तीचा बोध होतो, ते ज्ञान आहे. जे मायेत अडकवते, जे अशाश्वताविषयी सांगते आणि जे अहंकार जोपासते ते ‘अज्ञान’ आहे.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१२.९.२०१७)

देवाच्या चरणी शरणागतभाव ठेवण्याचे महत्त्व !

अ. साधकांनी ‘स्वतःकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया होत नाही’, असा विचार करत रहाण्यापेक्षा देवाशी अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले नेहमी म्हणतात, ‘‘देवाशी असलेले अनुसंधानाचे विचारच साधकाला मोक्षापर्यंत नेतात; म्हणून देवाच्या चरणी शरणागतभाव ठेवून प्रत्येक कृती करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.’’ आ. ‘प्रत्येक प्रसंगात समोरच्या व्यक्तीला छान (योग्य शब्दांत) उत्तर देणे’, ही … Read more