साधकांना मृत्यूचे भय कशाला ?
साधकांना मृत्यूचे भय कशाला ? एका आश्रमातून (ठिकाणाहून) दुसर्या आश्रमात (ठिकाणी) जाण्याप्रमाणे मृत्यू आहे ! – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
साधकांना मृत्यूचे भय कशाला ? एका आश्रमातून (ठिकाणाहून) दुसर्या आश्रमात (ठिकाणी) जाण्याप्रमाणे मृत्यू आहे ! – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
तुम्ही व्यवहाराने केवळ मनुष्याच्या लक्षात रहाता, तर साधना केल्याने देवाच्या नक्कीच लक्षात रहाता. – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
आपल्या दृष्टीतच अध्यात्म आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ईश्वरी तत्त्व पाहिले, तर आपल्याला त्या त्या ठिकाणी ईश्वरी तत्त्वाची अनुभूती येते. – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
‘भूतकाळातील आठवणींमध्ये न रमता, न रेंगाळता त्यांतील सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्याला वर्तमानकाळात रहायचे आहे. असे केल्यानेच आपल्या भावना संपतात, नाहीतर त्या आपल्याला मायेत अडकवतात. भावजागृतीचे प्रयत्न करणे, हे आपल्या भावनांना संपवण्याचे उत्तम साधन आहे.’ – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
‘भक्तीभावाने ज्ञान मिळवले, तर त्याचा अहं वाटत नाही; परंतु ज्ञानमार्गाने ज्ञान मिळवले, तर अहं निर्माण होण्याची दाट शक्यता असते; म्हणून नित्य भावजागृतीचे प्रयत्न करण्यास अत्यंत महत्त्व आहे. भक्तीमुळे ज्ञानात गोडवा निर्माण होतो, नाहीतर केवळ ज्ञानाच्या इच्छेमुळे मिळालेले ज्ञान रुक्ष भासते.’ – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
‘देवाच्या कृपेनेच आपली प्रत्येक गोष्ट होत आहे’, असा भाव ठेवून प्रत्येक कृती केली, तर ती गोष्ट सोडतांनाही ती भावपूर्ण पद्धतीनेच सोडली जाते. ‘सर्व देवच करतो’, असा भाव असेल, तर कोणतीही गोष्ट करतांनाही काही वाटत नाही आणि ती सोडतांनाही काही वाटत नाही. देवामुळे ‘करणे आणि सोडणे’ या प्रक्रिया सहज होऊन जातात. एखाद्या परिस्थितीतही आनंद आणि परिस्थितीच्या … Read more
सेवा करतांना व्यक्तीपेक्षा तत्त्व पहाणे, हेच वैराग्य होय. व्यक्तीनिष्ठता सोडून तत्त्वनिष्ठता जपणे, म्हणजे वैराग्य अंगी बाणवणे होय. प्रत्येक गोष्टीत देवाला पहाणे, हे खरे वैराग्य ! – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
अ. ‘सेवेतून चित्तावरील संस्कार लवकर अल्प होतात आणि मनही निर्विचार होते. त्यामुळे नामाच्याही पलीकडे जाणे लवकर शक्य होते. आ. साधना करतांना प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्यात वेळ दवडू नये. कृती करून अनुभवातून शिकून लवकर पुढे जावे. यामुळे बुद्धीचा अडथळा दूर होऊन अध्यात्मात लवकर प्रगती होते !’ – पू (सौ.) अंजली गाडगीळ
‘एखादी गोष्ट मी करत नाही, तर ती दुसर्याला करायला कशी सांगू ?’, असा विचार करू नये. जेव्हा तुम्ही एखादी चांगली गोष्ट किंवा चूक लक्षात आल्यावर साहाय्य म्हणून दुसर्याला लगेच सांगता, तेव्हा तुमच्या सांगण्यातील तळमळीमुळे तुमच्यावरही तिचा परिणाम होतो.’ – पू (सौ.) अंजली गाडगीळ
‘साधनेने मनोलय आणि बुद्धीलय झाला की, ईश्वर आवश्यक ते देतो. त्यामुळे तेव्हा अनावश्यक वाचन करण्यात आपला वेळ जात नाही. जगात अनावश्यक वाचन करणारे अभ्यासक अनेक आहेत; परंतु साधना करून ईश्वरप्राप्ती करून घेणारे मोजकेच आहेत. केवळ अभ्यासाने उत्कर्ष होत नाही, तर साधनेने खरा उत्कर्ष होतो ! – पू (सौ.) अंजली गाडगीळ