‘सर्व देवच करतो’, हा भाव असेल, तर कोणतीही गोष्ट करतांना आणि ती सोडतांनाही काही न वाटणे

‘देवाच्या कृपेनेच आपली प्रत्येक गोष्ट होत आहे’, असा भाव ठेवून प्रत्येक कृती केली, तर ती गोष्ट सोडतांनाही ती भावपूर्ण पद्धतीनेच सोडली जाते. ‘सर्व देवच करतो’, असा भाव असेल, तर कोणतीही गोष्ट करतांनाही काही वाटत नाही आणि ती सोडतांनाही काही वाटत नाही. देवामुळे ‘करणे आणि सोडणे’ या प्रक्रिया सहज होऊन जातात. एखाद्या परिस्थितीतही आनंद आणि परिस्थितीच्या त्यागातही आनंद अनुभवणारे संत सहजस्थितीला असतात.’

– पू.( सौ.) अंजली गाडगीळ

Leave a Comment