खरा अभ्यास !

ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाने, देवाच्या संगतीने आणि संतांच्या आशीर्वादाने विविध विषयांचे केलेले चिंतन अन् मनन म्हणजेच खरा अभ्यास ! – पू.( सौ.) अंजली गाडगीळ

भक्ताच्या निर्विचार अवस्थेत देव त्याचा विचार करतो.

‘मायेत मनुष्य ‘स्व’मध्ये अडकतो, तेव्हा तो ‘सर्व मीच करत आहे’, असा विचार करतो आणि देव निर्विचार स्थितीत असतो. याउलट भक्त जेव्हा सर्वकाही देवावर सोडतो, तेव्हा भक्त निर्विचार अवस्थेत जातो आणि देव त्याचा विचार करतो किंवा त्याचे कार्य करतो. – पू.( सौ.) अंजली गाडगीळ

गुरुकृपेने कर्मसंपन्नता प्राप्त होणे

‘गुरूंचे सांगणे ऐकल्याने साधकाला देवाचा आशीर्वाद लाभतो. त्यामुळे तो पुण्यशील बनतो. पुण्यशीलता म्हणजेच साधकाच्या जीवनातील खरी धनसंपन्नता ! यामुळे साधकाचे कित्येक जन्मांचे कर्मदारिद्य्र नष्ट होऊन त्याला कर्मसंपन्नता येते, म्हणजेच त्याचे प्रत्येक कर्म फलद्रूप होते. गुरूंच्या सत्संगात राहूनही जो कोरडाच रहातो, तो खर्‍या अर्थाने कर्मदरिद्री म्हणायला हवा !’ – पू.( सौ.) अंजली गाडगीळ

अध्यात्मातील प्रत्येक विचार देवापर्यंत नेतो.

मायेतील कोणताही विचार हा देवाण-घेवाण वाढवणाराच असतो; परंतु अध्यात्मातील प्रत्येक विचार हा देवापर्यंत नेणारा असतो, म्हणजेच देवाण-घेवाण संपवणारा असतो. – पू.( सौ.) अंजली गाडगीळ

प्रेमभावाचे महत्त्व

‘कार्यपद्धतीतील तत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वांना एकच कार्यपद्धत लागू करून त्यांच्याकडून सेवा करवून घेता येत नाही. साधकांना प्रेम दिल्यानेच ७० टक्के अडचणी सुटतात आणि साधकांना साधनेचा अन् सेवेचा आनंदही मिळतो.’ – पू.( सौ.) अंजली गाडगीळ

भावजागृतीचे महत्त्व

अ. काळच आयुष्य पुसून टाकतो. आयुष्यातील अडचणींकडे पुष्कळ लक्ष न देता त्यात गुंतणे टाळावे. आपण भावजागृतीचे प्रयत्न करून पुढे जायला हवे. मग आयुष्यातील अडचणी काळाच्या ओघात दूर होतात. आ. आपण जेथे जातो, तेथे आपल्या भावामुळेच स्थानमाहात्म्य निर्माण होते. – पू.( सौ.) अंजली गाडगीळ

परिपूर्ण सेवेचे महत्त्व

सेवा परिपूर्ण केली, तरच आकाशमंडलात देवतांकडून सेवेची नोंद होते, म्हणजेच पुण्य-संचय होतो. – पू.( सौ.) अंजली गाडगीळ