कार्यपूर्तीसंदर्भात प्रयत्न आणि यज्ञयाग यांचे महत्त्व

‘प्रयत्नांमुळे योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो. यज्ञयाग करूनही योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.२.२०२२)

तिस-या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना करा !

‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१ अर्थ : माझा भक्त नाश पावत नाही. भक्ताला, साधना करणार्‍यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव तिसर्‍या महायुद्धात वाचवील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

कठोर साधनेचे महत्त्व !

‘संत बहिणाबाईंनी ‘अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर । आधी हाताला चटके, तेव्हां मिळते भाकर !’ हे जे व्यावहारिक जीवनाबद्दल सांगितले आहे, ते आध्यात्मिक जीवनालाही लागू पडते – ‘अरे साधना साधना, जसा तवा चुल्ह्यावर । आधी हाताला चटके, मग मिळतो ईश्वर ।’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.१.२०२२)

भारताच्या तथाकथित ‘सुधारणावादा’मुळे आध्यात्मिक क्षेत्रात होणारी हानी !

‘स्वातंत्र्योत्तर काळात समाजधुरिणांनी समाजाला ‘अध्यात्म आणि साधना’ हे विषय शिकवलेच नाहीत. तथाकथित ‘सुधारणावादा’च्या नावाखाली त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. लोकशाहीत कायदे सिद्ध करतांनाही याचा विचार केला गेला नाही. त्यामुळे आता एखादा लहान मुलगा त्यांच्या पूर्वजन्मीच्या साधनेच्या संस्कारामुळे या जन्मात साधना म्हणून सेवा करू लागल्यास त्याचे कौतुक होत नाही, उलट त्याच्यावर टीका होऊन तो सात्त्विक जीवही साधना … Read more

साधना सर्वांना सर्वस्वाचा त्याग करायला शिकविते

‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून भ्रष्टाचार इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘पंडित’ कोणाला म्हणावे ?

सत्-असत् जाणणारा आणि ज्याच्यामध्ये विवेकबुद्धी आहे, अशा विवेकी पुरुषाला ‘पंडित’ म्हणतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)

अध्यात्मात साधनेचा आरंभ कसा होतो ?

‘अध्यात्मात साधनेचा आरंभ, म्हणजे ‘अ’ (A) असे काही नसते. ज्याच्या त्याच्या पातळीप्रमाणे आणि साधनामार्गाप्रमाणे प्रत्येकाच्या साधनेचा आरंभ होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.१२.२०२१)

हिंदूंच्या दु:स्थितीमागील कारण !

‘मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सध्याच्या काळातील काही सुखलोलूप मनुष्य म्हणजे केवळ ‘देहधारी मनुष्यप्राणी’ !

‘बहुतांश जण आयुष्यातील प्रत्येक कृती करतांना ‘मला यातून अजून सुख कसे मिळेल ?’, यासाठीच धडपड करतात. देवाने इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्याला साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठीचे क्रियमाणकर्म दिले आहे; परंतु ते वापरत नसल्यामुळे त्यांचे जीवन किडा-मुंगीप्रमाणे केवळ स्वतःच्या सुखासाठी जगण्यासारखे झाले आहे. त्यामुळे सध्याच्या काळातील असे मनुष्य म्हणजे ‘देहधारी मनुष्यप्राणी’ झाले आहेत.’ – (परात्पर … Read more