देवदर्शन आणि देवस्मरण यांमधील भेद !

देवदर्शनाला स्थुलाचे बंधन आहे; पण देवस्मरणाला त्याचे बंधन नाही. आपण असू, तिथे त्याला अनुभवता येऊ शकते. त्यासाठी आपली तेवढी श्रद्धा आणि तळमळ हवी. -श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीचे दर्शन म्हणजे ईश्वरी ऊर्जेचे दर्शन !

आपण एखाद्या आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीचे दर्शन घेतो, तेव्हा ते केवळ त्या व्यक्तीचे दर्शन नसून त्याच्या ठिकाणी असलेल्या ईश्वरी ऊर्जेचे दर्शन असते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

ईश्वराचे खरे भक्त कधी होता येते ?

संतांचे मन ओळखून त्यांची सेवा करण्यासाठी उत्तम शिष्यासारखा भावच हवा, तरच ईश्वराचे खरे भक्त होता येते. -श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

संत वर्तमानकाळात रहात असल्याने त्यांच्या मनाची शक्ती पूर्ण वापरली जाते

संतांना मागची आठवण नसते आणि त्यांच्या मनात पुढचा विचार येत नाही. संत वर्तमानकाळात रहात असल्याने त्यांच्या मनाची शक्ती पूर्ण वापरली जाते. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

‘संत’ ही जगातील सर्वोच्च पदवी !

‘भारतरत्न, नोबेल इत्यादी मानवाने दिलेल्या पारितोषिकांचे ‘संत’ या ईश्वराने दिलेल्या पदवीपुढे काय मूल्य आहे ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्यवहार आणि साधना यांमधील भेद

‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा !

‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीबद्दल थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

इतर विषयांवरील लिखाणापेक्षा आध्यात्मिक विषयांवरील लिखाण महत्त्वाचे !

‘एखाद्या संस्थेचा अध्यक्ष, पदाधिकारी असणे किंवा वृत्तपत्राचा संपादक असणे, हे खूप मानाचे समजले जाते. या दोन्ही पदांचा विचार केला, तर समाजामध्ये आजवर अनेक संस्थांचे नामवंत पदाधिकारी, तसेच नामवंत संपादक होऊन गेले आहेत. अनेक पदाधिकार्‍यांनी त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्ये केली आहेत, तसेच अनेक संपादकांनी त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनप्रबोधनाचे कार्य केले आहे. असे असले, तरी … Read more