दुस-यांना विचारून करण्याचे महत्त्व

‘श्रीगुरूंच्या आश्रमाचे किंवा संस्थेचे सर्व नियम न चुकता पाळले पाहिजेत. तसे न करता जर एखाद्याने नियमबाह्य (नियमाविरुद्ध) वर्तन केले आणि ते पाहून जर दुसराही तसेच वागला, तर त्यामुळे सर्वांचेच अहित होईल, तसेच संस्थेची शिस्त आणि सुव्यवस्था कोलमडून जाऊन त्यामुळे श्रीगुरुही अपकीर्त होतील. असे झाल्यास आपली प्रगती (आध्यात्मिक) होणार नाही. त्यामुळे श्रीगुरूंनी आपल्याच उद्धारासाठी स्थापलेली संस्था बंद पडेल. आपल्या वागण्याचे कोणते परिणाम होतील, यावर दूरदृष्टी ठेवून आपण आपले प्रत्येक कार्य केले पाहिजे. त्यासाठी एखादी गोष्ट स्वतःला समजली नाही, तर ती आपण दुसर्‍यांना विचारून समजून घेऊन करावी.’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : मासिक ‘अमृतवाणी’, नोव्हेंबर १९९५)

Leave a Comment