देवाचे भक्त होण्याचे महत्त्व !

‘आपण देवाचे भक्त बनलो की, देव आपत्काळातही आपल्या तोंडात सोन्याचा चमचा ठेवतो, म्हणजेच तो आपल्याला आपत्काळाची झळ लागू देत नाही !’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

भक्ती ही सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठतम असणे

‘भक्तीचे महत्त्व भक्तच जाणू शकतो. ते शब्दाने वर्णन करणे शक्य नाही. भक्तीचे वर्णन करावयास मानवी शब्द न्यूनच पडतील. भक्ती भक्तांच्या मनानेच जाणणे शक्य आहे. ती अनुभवाने समजू शकते. स्वानुभवानेच अनुभवता येणार्‍या भक्तीविषयी शब्दांच्या अवडंबराने कंठशोष करण्यापेक्षा तिचा अनुभव घेऊन पहा, ती समजून घ्या, तिच्यापासून चांगली फळे प्राप्त करून घ्या. भक्तीमार्ग सर्वांना अनुकूल असाच आहे. सर्व … Read more

अध्यात्मात तेजतत्त्वापेक्षा सूक्ष्म असलेल्या आकाशतत्त्वाची अनुभूती कानांनी येत असल्याने डोळ्यांपेक्षा कान हे श्रेष्ठ ज्ञानेंद्रिय असणे

‘आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या सर्व अवयवांमध्ये आपला सर्वात महत्त्वाचा अवयव डोळे असतात’, असे आपल्याला जाणवते. त्यामुळे ‘डोळे हा मनाचा आरसा असतात’, असेही म्हणतात; परंतु सृष्टीतील पंचभौतिक पदार्थांचे ज्ञान करून घेण्यासाठी ईश्‍वराने आपल्याला पंचज्ञानेंद्रिये दिली आहेत. पंचज्ञानेंद्रियांमध्ये डोळ्यांनी तेजतत्त्वाची अनुभूती येते, तर कानांनी आकाशतत्त्वाची अनुभूती येते. आकाशतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा अधिक सूक्ष्म असल्यामुळे कानांच्या माध्यमातून अधिक … Read more

चिरंतन आनंद प्राप्तीसाठी साधनेला पर्याय नाही !

देवावर आणि साधनेवर विश्‍वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो. – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

तरुण वयातच साधना करण्याचे महत्त्व !

‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

भगवंताचे नाम

१. भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशांप्रमाणेच आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते. २. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे, तसे नाम हे मनाचे जीवन आहे. – श्री गोंदवलेकर महाराज (संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)

परमार्थात सूक्ष्म चिंतन आवश्यक असणे !

‘परमार्थ म्हणजे परम अर्थ. श्रेष्ठ असणार्‍या ‘आत्मतत्त्वाचा आत्मलाभ’ म्हणजेच परमार्थ आहे. अत्यंत सूक्ष्म अशा जाणिवेत चिंतन असावे. त्याकरता काळ, वेळ आणि ठावठिकाणा यांची कसलीच आवश्यकता नसते. ‘अंतरी अखंड समाधान’, हीच त्याची फलश्रुती होय !’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक, ‘श्रीधर-संदेश’, फेब्रुवारी १९९९)

नामजप आणि यज्ञ

१. ‘नामजप आणि मंत्रजप करणे या व्यष्टी साधना आहेत, तर यज्ञ करणे ही समष्टी साधना आहे. २. काही साध्य करण्यासाठी एखाद्याला नामजप अनेक दशके करावा लागतो. याउलट यज्ञ काही सात्त्विक पुरोहितांनी काही तास किंवा दिवस केल्यास २० – २५ किलोमीटर अंतरातील सहस्रो लोकांनाही त्याचा लाभ होतो. ’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

भारत देशाचे महत्व

पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो ! -(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

हिंदु राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?

हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?, असा प्रश्‍न काही जण विचारतात. त्याचे उत्तर आहे, नालंदा आणि तक्षशिला विश्‍वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ईश्‍वरप्राप्ती कशी करायची ?, हेही शिकवले जाईल. -(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले