समष्टीचे मन जिंकणारा कुटुंबभाव !

आपल्यात ‘कुटुंबभाव’ असेल, तर समष्टीला आपण आपल्याजवळ आणू शकतो, आपण समष्टीशी एकरूपता साधू शकतो, आपण समष्टीचे मन जिंकू शकतो. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

नामहाकेला धावून येणारा भगवंत !

कोणत्याही मनुष्याला हाक मारल्यावर तो मागे वळून पहातो. जेव्हा आपण भगवंताचे नाम घेऊन त्याला हाक मारतो, तेव्हा तो आपल्यासाठी येणार नाही का ? – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

मंत्रांचे जसेच्या तसे ध्वनीमुद्रण करून त्यावर कोणत्याही इतर असात्त्विक नादाची प्रक्रिया न करणेच अधिक फलदायी आहे !

‘इको’ (Eco sound) नादामध्ये सात्त्विकता अल्प असते. बरेच जण मंत्रांचे ध्वनीमुद्रण करतात. मंत्रांच्या ध्वनीमुद्रणाचे संकलन करतांना त्या नादाला वेगवेगळे संगीत जोडले जाते किंवा ‘तो नाद घुमल्यासारखा वाटावा’, यासाठी त्याच्यावर संगणकीय प्रणालीद्वारे वेगवेगळे प्रयोग केले जातात. यामुळे मंत्रांतील मूळ नादातील सात्त्विकता अल्प होत जाते. मंत्रांच्या उच्चारामध्येच त्यांची सात्त्विकता दडलेली आहे. उच्चाराचा नादच जर संगणकीय विज्ञानाद्वारे नष्ट … Read more

कलियुगाला ‘संधिकाल’ का म्हटले आहे ?

कलियुगात १५ वर्षे खडतर साधना करणे, म्हणजे पूर्वीच्या युगांतील अनेक वर्षांची साधना करण्यासारखे आहे; कारण कलियुगात साधनेसाठी परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. त्यामुळेच या युगात इतर युगांच्या तुलनेत देव लवकर प्रसन्न होतो; म्हणूनच कलियुगाला ‘संधिकाल’ म्हटले आहे. संधिकाल म्हणजे थोडी साधना आणि पुष्कळ पुण्य ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य

आत्म्यावरील आवरण काढून आत्मशक्ती निर्माण झाली की, ‘तो जीव कोणतेही कार्य सहज सुलभ रितीने करू शकतो.’ जिवाची इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती मिळून जेव्हा कार्य होते, तेव्हा ते कार्य चैतन्याद्वारे सुलभ रितीने पार पडते. – परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)

साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे

साधनेला महागाईची अडचण नसते. साधनेला कशाची आवश्यकता नसते. कुठेही बसून साधना करता येते. – परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)

आत्मशक्तीचे सामर्थ्य !

भौतिक सुखाने तुमची चैतन्य शक्ती, सामर्थ्य वाढत नाही, उलट तुम्ही निर्बल, दुर्बल होता. यासाठी साधना करून आत्मशक्ती (चैतन्य शक्ती) वाढवणे आवश्यक आहे. – परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)

देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !

देवाप्रती असलेल्या भावामुळे साधकाला निर्णयक्षमता प्राप्त होते, म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते. दैवी प्रेरणा आणि शांत मन यांच्या साहाय्य्याने तो योग्य तो निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे त्याला परिस्थितीतून जलद पुढे जाता येते. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !

साधकाला जीवनातील नकारात्मक आणि सकारात्मक, अशा दोन्ही प्रकारच्या प्रसंगांतून शिकावे लागते. ‘साधकजीवन’, म्हणजे परिस्थितीला गुरु मानून सतत तिच्याकडून शिष्याप्रमाणे काहीतरी शिकत रहाणे. असे केल्याने साधकाला प्रारब्धभोगाचे काहीच वाटत नाही. कालांतराने साधकाची साधना वाढली की, त्याचे भोग न्यून होऊन गुरुकृपेला आरंभ होतो. एकदा का गुरु जीवनात आले की, नकारात्मकता आणि सकारात्मकता या दोन्हींतही उरतो, तो केवळ … Read more

समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !

‘हनुमंतानें व्यष्टी साधनेच्या, म्हणजेच रामभक्तीच्या बळावर रामराज्य स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणाऱ्यांनी व्यष्टी साधनाही मनापासून केली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले