परावाणीतील नाम
देवाचे भावपूर्ण घेतलेले प्रत्येक नाम हे परावाणीतीलच नाम आहे ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
देवाचे भावपूर्ण घेतलेले प्रत्येक नाम हे परावाणीतीलच नाम आहे ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
अध्यात्मात निरागसतेला पुष्कळ महत्त्व आहे. मन निरागस होण्यासाठी आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करता यायला हवा. त्यागातून निरपेक्षता येऊ लागल्यामुळेच मन निरागस होऊ लागते. मनातील अपेक्षा संपणे, म्हणजेच निरागसता ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
एकाग्रता साधता येण्यासाठी देवावरील श्रद्धा वाढली पाहिजे. नामजपात सातत्य आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नामजप करण्यातील सातत्यामुळे आपल्या जीवनातील अनेक चिंता दूर होतात. मनातील चिंता संपल्या की, मनात सकारात्मक विचार येण्याला प्रारंभ होतो. सकारात्मक विचारच पुढे जीवनाला अध्यात्माच्या दिशेने नेतात. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
सेवेतून अहं अल्प झाल्याने ईश्वराचे विचार लगेच ग्रहण करता येऊ शकतात आणि तशी कृती होऊ लागते. तेव्हाच खर्या अर्थाने कर्मयोग साधला जातो. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
शुद्ध आणि निर्मळ मन हे मंदिराप्रमाणे आहे, त्यामध्ये देवाचा वास असतो. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
सारे जीवन अनावश्यक असे काहीतरी मायेतील विषय शिकण्यापेक्षा जीवनाचा उद्धार करून देणारी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकून घेतली, तर ‘या भवसागरातून तरून जाणे’ सहज शक्य होते. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
आपत्काळात साधना करण्यास आपल्या अवतीभवती अध्यात्माला पोषक आणि पूरक वातावरण असेलच असे नाही; म्हणून आतापासूनच ‘कोणत्याही परिस्थितीत देवाच्या अनुसंधानात कसे रहाता येईल ?’, हेच पहावे. आपल्या मनाकडून तसा सरावही करून घ्यावा. आपण मनाला सतत भावाच्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे आपत्काळात पुढे कितीही कठीण प्रसंग आला, तरीही मनाची स्थिती डळमळीत होत नाही. पुढे संकटकाळीही देव … Read more
जेव्हा सद्गुरूंचे त्याच्या शिष्यावर नियंत्रण असते, त्या वेळी शिष्याच्या जीवनात चांगलेच घडत जाते. शिष्याच्या मनात अयोग्य विचार आले, तरीही गुरु त्याला एखाद्या लहान बाळाप्रमाणे समजून घेत असतात. शिष्याच्या बुद्धीप्रमाणे सद्गुरु प्रत्यक्ष प्रसंगातही त्याला बरेच काही शिकवत असतात. यातूनच शिष्याचे मन आपोआपच घडत जाते. गुरुसेवा करतांना शिष्याच्या मनात कितीही प्रमाणात नकारात्मक विचार आले, तरीही शिष्याने गुरुसेवा … Read more
ॐ’ कार स्थिती क्षणिक साधणे, म्हणजे साधना नाही. बर्याचदा काय होते की, ‘कुंडलिनी शक्ती जागृत झाली की, काही जणांचा ॐकार आतूनच चालू होतो.’ यामुळे देहातील तमोगुण न्यून होऊ लागतो; मात्र ही स्थिती कायम टिकेल, असे नसते. त्यासाठी नियमित स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेकडे लक्ष द्यावे लागते. यामुळे जिवावरील अयोग्य संस्कार नष्ट होऊ लागतात आणि … Read more
देव हा वेळ आणि काळ यांच्याही पलीकडे आहे. त्यामुळे देवाला कोणत्याही वेळेत बांधण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे मुहूर्त पाहून साधना करू नये. साधना सदा सर्वकाळच करावी. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ