चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य !

‘जे दृश्य आहे, ते विनाशी आणि जे अदृश्य असून चेतन स्वरूपी आहे, ते अविनाशी; पण विनाश पावणारी वस्तू केव्हाही सुखदायी असत नाही; म्हणून ते चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य आणि तोच दुःख निवारणाचा उपाय होय.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : ‘श्रीधर-संदेश’, मार्च २००२)

दान कसे असावे ?

‘देश, काल आणि पात्र पाहून, तसेच सत्कारपूर्वक, शुद्ध बुद्धीपुरस्सर अन् प्रतिफळाची आशा न धरता दिलेले दानच खरे दान आणि तेच गृहस्थाचे मोठे तप होय.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : ‘श्रीधर-संदेश’, जून २००१)

दुस-यांना विचारून करण्याचे महत्त्व

‘श्रीगुरूंच्या आश्रमाचे किंवा संस्थेचे सर्व नियम न चुकता पाळले पाहिजेत. तसे न करता जर एखाद्याने नियमबाह्य (नियमाविरुद्ध) वर्तन केले आणि ते पाहून जर दुसराही तसेच वागला, तर त्यामुळे सर्वांचेच अहित होईल, तसेच संस्थेची शिस्त आणि सुव्यवस्था कोलमडून जाऊन त्यामुळे श्रीगुरुही अपकीर्त होतील. असे झाल्यास आपली प्रगती (आध्यात्मिक) होणार नाही. त्यामुळे श्रीगुरूंनी आपल्याच उद्धारासाठी स्थापलेली संस्था … Read more

भक्ती ही सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठतम असणे

‘भक्तीचे महत्त्व भक्तच जाणू शकतो. ते शब्दाने वर्णन करणे शक्य नाही. भक्तीचे वर्णन करावयास मानवी शब्द न्यूनच पडतील. भक्ती भक्तांच्या मनानेच जाणणे शक्य आहे. ती अनुभवाने समजू शकते. स्वानुभवानेच अनुभवता येणार्‍या भक्तीविषयी शब्दांच्या अवडंबराने कंठशोष करण्यापेक्षा तिचा अनुभव घेऊन पहा, ती समजून घ्या, तिच्यापासून चांगली फळे प्राप्त करून घ्या. भक्तीमार्ग सर्वांना अनुकूल असाच आहे. सर्व … Read more

मनुष्याचे स्वातंत्र्य !

‘मनुष्याला स्वातंत्र्य असते, तर इच्छेप्रमाणे सारे होऊ शकले असते; पण तसे होत नाही. म्हणूनच त्याला ‘अस्वातंत्र्य’ म्हणावे लागते.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, ऑक्टोबर १९९८)

समाजात समता नांदावी, यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या गुणकर्मानुसार त्याला विषम अधिकार देणे अनिवार्य असणे !

‘समतेसाठी लढणार्‍या सैन्यात सेनापती, हाताखालचे निरनिराळे अधिकारी, चतुरंगसेना इत्यादी भेद (फरक) परस्पर अधिकार तारतम्यामुळे असतातच. ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार आज्ञाकारी, आज्ञाधारी हे भेद नाहीसे केल्यास कोणतेच राष्ट्र टिकणार नाही. कोणत्याही खात्यात, न्यायालयात उच्च-नीच भेद, अधिकार – तारतम्य आणि अल्प-अधिक कार्यक्षमता असतेच. सर्व भेदांचे निर्मूलन करण्यासाठी भरलेल्या सभेतही, स्थापलेल्या समाजातही, समतेचा उदो उदो करणार्‍या राष्ट्रातही अध्यक्ष, उपाध्यक्ष … Read more

बोलल्याप्रमाणे चालणारी माणसे हवीत !

‘आज बोलल्याप्रमाणे चालणारी माणसे हवी आहेत. नुसते बोलून भागणार नाही. पाकशास्त्राचे नुसते तोंडाने वर्णन केल्यास त्याने पोट भरेल का ? त्यासाठी स्वयंपाक करून जेवण केल्यानेच पोट भरणार आहे. म्हणूनच मनुष्याने बोलल्याप्रमाणे वागणेच योग्य होय.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर – संदेश’, फेब्रुवारी २००३)

विरक्ताने जीभ आवरावी !

‘जन्म झाल्यापासून कितीही खाल्ले असले, तरी ‘खायला हे पाहिजे, ते पाहिजे’ म्हणून कटकट करणारी जीभ कधी गप्प बसली आहे, असे नाही. हे झाले सज्जन गृहस्थाचे. ज्यांना स्त्रियांचे आणि उपाहारगृहातील चटकदार पदार्थांचे व्यसनच लागले आहे. त्यांना कुबेराची संपत्तीही अल्पच पडेल. एकंदरीत पैशाचा विनियोग प्रायः एक स्त्री आणि दुसरी जीभ, या दोघींचा हट्ट पूर्ण करण्याकडेच होत असल्यामुळे … Read more

वैदिक आर्य संस्कृती हीच भारतियांचा आणि हिंदूंचा प्राण !

‘आपली वैदिक संस्कृती अत्यंत महान आहे. संस्कृती सोडणे म्हणजे हाताला लागलेला धनसंपत्तीचा साठा सोडण्यासारखेच आहे. वैदिक आर्य संस्कृती ही भारतियांचा आणि हिंदूंचा प्राणच होय. ती नष्ट झाल्यास हिंदु समाज मृतवत् झाल्यासारखाच होईल. वैदिक आर्य संस्कृती ही परमेश्‍वराकडून आलेली अनादी, अच्युत आणि अतिशुद्ध असून ती अनादि मानवी संस्कृतीपासून चालत आली आहे.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ … Read more

परमार्थात सूक्ष्म चिंतन आवश्यक असणे !

‘परमार्थ म्हणजे परम अर्थ. श्रेष्ठ असणार्‍या ‘आत्मतत्त्वाचा आत्मलाभ’ म्हणजेच परमार्थ आहे. अत्यंत सूक्ष्म अशा जाणिवेत चिंतन असावे. त्याकरता काळ, वेळ आणि ठावठिकाणा यांची कसलीच आवश्यकता नसते. ‘अंतरी अखंड समाधान’, हीच त्याची फलश्रुती होय !’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक, ‘श्रीधर-संदेश’, फेब्रुवारी १९९९)