भक्ती ही सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठतम असणे

‘भक्तीचे महत्त्व भक्तच जाणू शकतो. ते शब्दाने वर्णन करणे शक्य नाही. भक्तीचे वर्णन करावयास मानवी शब्द न्यूनच पडतील. भक्ती भक्तांच्या मनानेच जाणणे शक्य आहे. ती अनुभवाने समजू शकते. स्वानुभवानेच अनुभवता येणार्‍या भक्तीविषयी शब्दांच्या अवडंबराने कंठशोष करण्यापेक्षा तिचा अनुभव घेऊन पहा, ती समजून घ्या, तिच्यापासून चांगली फळे प्राप्त करून घ्या. भक्तीमार्ग सर्वांना अनुकूल असाच आहे. सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठतम आणि निरवधी सुखदायक आहे.’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, सप्टेंबर १९९७)

Leave a Comment