सध्याची समाजस्थिती डोळे झाकून आंधळ्याच्या मागेच जाणे

‘थोडासा विचार केल्यास जगातील वैभव आणि सुख यांसाठी धडपडणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. सध्याच्या लोकशाहीप्रमाणे बहुमताचा निर्णय मानून, जगातील सुखात समाधान मानून, तेच आपल्या जीविताचे इति कर्तव्य आहे, असे जर समजलो, तर ‘विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः ।’ (नीतिशतक, श्‍लोक १०) ‘म्हणजे विवेकभ्रष्ट झालेल्या लोकांचे अनेक प्रकारे अधःपतन होते’ या सुभाषिताप्रमाणे सर्व बाजूंनी अधःपतनच होईल. … Read more

स्वतःतील दोष दूर करण्याचे महत्त्व

‘दुसर्‍याचे दोष शोधण्यासाठी आपण जितकी बुद्धी व्यय (खर्च) करतो, तेवढी आपण स्वतःचे दोष शोधण्यात व्यय केल्यास आपण दुःख-दौर्बल्यापासून मुक्त होऊ’, असे उपनिषदांनी म्हटले आहे. आपले दोष आपल्याला दिसत नाहीत; पण आपल्याकडून दुसर्‍याचे दोष मात्र अचूकपणे शोधले जातात. आपले दोष जाणणाराच ‘विवेकी’ होय ! आपले दोष निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केल्यासच ते नाहीसे होण्याची शक्यता असते; अन्यथा … Read more

विवेक

‘देहाचे पांघरूण वस्त्र आणि माझे पांघरूण देह. त्यामुळे ‘माझ्या भानासह ‘मी’ देहाहून अगदीच भिन्न असणारा आहे’, असे वाटणे म्हणजेच विवेक.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : ‘श्रीधर – संदेश’, जुलै २००२)

जीवन-मुक्त

‘याची देही, याची डोळा’ आपले मरण आणि जन्मही पाहून तेथे दुसरे काहीही न रहाता, स्वतःच शेष रहाणे, यालाच ‘जीवन-मुक्त’ म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : ‘श्रीधर – संदेश’, नोव्हेंबर २०००)

खऱ्या मनुष्याचे लक्षण

‘परमात्म्याची कृपा श्रेष्ठ असून संसार मिथ्या आहे, हे कुणालाच आपोआप उमजत नाही. नुसत्या गप्पा येतील; पण आचरण मात्र त्यानुरूप होत नाही. जन्माला आलेल्यास मरण चुकत नाही, लक्ष्मी चंचल आहे, इंद्रियवशतेमुळे नाश ओढवतो’, या सगळ्या गोष्टी ठाऊक नाहीत, असा कुणीही नाही; पण मनातले विचार प्रत्यक्षात आचरणात आणणारे किती निघतील ? मनुष्याची योग्यता त्याच्या आचरणाने सिद्ध होत … Read more

मोक्ष

‘अज्ञानरूपी धुके नष्ट होऊन आत्मरूपाचा प्रकाश सर्वत्र परिपूर्ण असणे, यालाही मोक्ष म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, सप्टेंबर १९९९)

नश्ववर देह आणि आत्मा

‘या नश्‍वर देहास बाहेरून सजवण्यासाठी निरनिराळे अलंकार घातले, निरनिराळ्या प्रकारची उटणी, साबण यांनी स्वच्छ करून आणि सुवासिक करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या देहातील आत्म्यास त्याचा काहीही उपयोग नसतो. त्याला सुगंध किंवा दुर्गंध याचेही काही वाटत नसते. जसे ताप आलेल्या मनुष्याने कुपथ्य केल्यास ताप वाढतो, तसा शृंगार हा विषयवासनायुक्त मनुष्यास अधोगतीस नेण्यास पात्र होतोे. क्षयी मनुष्यास … Read more

मनाला नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्व !

‘आपले मन नियंत्रणात न ठेवता, कह्यात न ठेवता, मानेल तसे भटकण्यास त्याला मोकळीक दिली, तर ते बेलगाम होईल. केवळ असमाधानीपणामुळे अशा व्यक्ती आपले आयुष्य वाया घालवतील. विषयसुखाभिलाषी अशा सुखोपभोगांनी अशा व्यक्तींना कधीही तृप्ती मिळणार नाही.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘ श्रीधर-संदेश’, ऑगस्ट १९९९)

स्वतःच्या आत्मरूपाचा शोध घेऊन आनंदघन होणे महत्त्वाचे !

‘या सुकणार्‍या, नश्‍वर देहाचा अभिमान किती दिवस ठेवायचा? यामध्ये काय आहे ? आनंदघनाचे स्वरूप विसरण्यास याचा अभिमान कारण बनून अपरिमित दुःखास कारणीभूत होत असेल, तर याचा अभिमान सोडण्यास कोणता मुहूर्त पहावयास हवा ? भ्रमात राहू नकोस, आपल्या आत्मरूपाचा शोध घेऊन आनंदघन हो, खरोखरंच दुसरे काहीही नाही. जन्म-मरणाची वार्ता हे शेवटचे भाष्य आहे.’ – प.प. भगवान … Read more

दुष्कर्मी लोकांची मानसिकता !

‘दुष्कर्मी लोक दुराचारासाठी एकत्र आले, तरी त्यांचे मित्रत्व कामापुरतेच असते. थोडेसे जरी बिनसले, तरी ते एकमेकांचे शत्रू होतात, एवढ्यावरूनच न थांबता ते एकमेकांच्या विनाशाचीच इच्छा धरतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, मार्च २००३)