सध्याची समाजस्थिती डोळे झाकून आंधळ्याच्या मागेच जाणे

‘थोडासा विचार केल्यास जगातील वैभव आणि सुख यांसाठी धडपडणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. सध्याच्या लोकशाहीप्रमाणे बहुमताचा निर्णय मानून, जगातील सुखात समाधान मानून, तेच आपल्या जीविताचे इति कर्तव्य आहे, असे जर समजलो, तर ‘विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः ।’ (नीतिशतक, श्‍लोक १०) ‘म्हणजे विवेकभ्रष्ट झालेल्या लोकांचे अनेक प्रकारे अधःपतन होते’ या सुभाषिताप्रमाणे सर्व बाजूंनी अधःपतनच होईल. सध्याची समाजस्थिती खरोखरच अशीच दिसून येते. आजचा समाज ‘अन्धेनैव नीयमाना यथान्धाः ।’ (मुण्डकोपनिषद्, मुण्डक १, खण्ड २, वाक्य ८) म्हणजे ‘एका अंधाने नेलेल्या दुसर्‍या अंध माणसाप्रमाणे डोळे झाकून आंधळ्याच्या मागेच चालला असून त्यातच ‘आपण धन्य झालो आहोत’, असे समजतो.’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, जानेवारी १९९०)

Leave a Comment