झोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

1395311753_Nidra_Flash_banner_Antim

सध्या अनेक साधकांना रात्री पहुडल्यावर बराच वेळ झोप येत नाही किंवा मध्यरात्री वा उत्तररात्री जाग आल्यावर पुन्हा झोप लागत नाही. अशा साधकांनी झोप लागेपर्यंत एक-आड-एक पद्धतीने श्री दुर्गादेव्यै नमः । आणि श्री गुरुदेव दत्त । हे नामजप किंवा श्री हनुमते नमः । किंवा श्री दुर्गादेव्यै नमः । हा नामजप करावा. तरी झोप लागत नसल्यास नामजपाला आरंभी आणि शेवटी एक ॐ लावावा. त्यानंतरही लवकर झोप लागत नसल्यास नामजपाला आरंभी आणि शेवटी दोन ॐ लावावेत. नामजपाच्या आरंभी श्री निद्रादेवी, तसेच ज्या देवतेचा नामजप करणार, ती देवता यांना भावपूर्ण प्रार्थना केल्यामुळे वरील आध्यात्मिक उपायाची परिणामकारकता वाढते.

संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ नामजपाचे उपाय