मुद्रा म्हणजे काय ?

मुद्रा-विज्ञान ही प्राचीन काळापासून हिंदु धर्माने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. ऋषिमुनींनी सांगितलेल्या मुद्राशास्त्राचा अभ्यास भारतातील अनेक योगाचार्य आणि अभ्यासक यांनी केला आहे. मुद्रा-उपायाची तत्त्वप्रणाली समजून घेऊन त्यांनी मानवी आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील, अशा नवनवीन मुद्रांचाही शोध लावला आहे.

ब्रह्मांडासारखाच मानवी देहही पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांनी बनलेला आहे. यांना पंचमहाभूते असेही म्हणतात.
आता आपण मुद्रा आणि न्यास यांची थोडक्यात ओळख करून घेऊया.

१. मुद्रा

१ अ. मुद्रा या शब्दाचा अर्थ

मानवाच्या प्रत्येक कृतीतून त्याचे शरीर किंवा शरिराचे अवयव यांचे आकृतीबंध निर्माण होतात. तसेच हाताच्या बोटांचा एकमेकांना स्पर्श झाला किंवा बोटे एका विशिष्ट प्रकारे जुळवली की वेगवेगळ्या प्रकारचे आकृतीबंध बनतात. या आकृतीबंधांना मुद्रा असे म्हणतात.

१ आ. विकार-निर्मूलनाच्या संदर्भात मुद्रांचे महत्त्व

मानवाच्या देहात पंचमहाभूतांचा असमतोल झाला, तर रोग निर्माण होतात. मानवी देहातील पंचमहाभूतांचा समतोल राखणे, ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. मुद्रांच्या साहाय्याने मानवाला स्वतःच्या देहातील पंचमहाभूतांच्या प्रमाणाचे संतुलन राखणे सहज शक्य आहे.

१ इ. पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करणारी हातांची बोटे

ऋषिमुनी आणि ज्योतिषशास्त्र यांनुसार मानवाच्या हाताची पाच बोटे पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. या संदर्भात पुढील दोन विचारसरणी आहेत.

१ इ १.  दोन विचारसरणी

१ इ १ अ. पहिली विचारसरणी

अ. बोटे आणि संबंधित महाभूत : करंगळी, अनामिका (करंगळीजवळील बोट), मध्यमा (मधले बोट), तर्जनी (अंगठ्याजवळचे बोट) आणि अंगठा ही बोटे अनुक्रमे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या महाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. [संदर्भग्रंथ : १. शारदातिलक (अध्याय २३, श्‍लोक १०६ वरील टीका) आणि २. स्वरविज्ञान (चण्डी काशन, कौल कल्पतरु चण्डी कार्यालय, अलोती देवीमार्ग, याग १२२ ००६.)]

आ. पंचमहाभूतांचा क्रम : पंचमहाभूतांपैकी पहिले असणारे पृथ्वीतत्त्व हे सगुण तत्त्वाचे दर्शक आहे. त्यानंतर क्रमाने येणार्‍या आप, तेज आणि वायु या तत्त्वांमध्ये सगुणाचे प्रमाण अल्प होत जाऊन निर्गुणाचे प्रमाण वाढते. शेवटचे असणारे आकाशतत्त्व हे निर्गुण तत्त्वाचे दर्शक आहे. यानुसार वर दिलेला बोटांचा क्रम पंचमहाभूतांचा क्रम – सगुणातून निर्गुणाकडे असे सूचित करतो.

साधना करून सगुणाकडून निर्गुणाकडे जाणे, हे साधकाचे ध्येय असते; म्हणून उपायांसाठी पहिली विचारसरणी निवडली आहे.

१ इ १ आ. दुसरी विचारसरणी

अ. बोटे आणि संबंधित महाभूत : अनामिका, करंगळी, अंगठा, तर्जनी आणि मध्यमा ही बोटे अनुक्रमे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या तत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात.

 

२. मुद्रा करतांना बोटांची स्थिती कशी असावी ?

अ. मुद्रा करतांना जे बोट दुसर्‍या बोटाच्या टोकाशी जुळवावे लागते किंवा मुळाशी टेकवावे लागते किंवा तळव्यावर टेकवावे लागते, त्या बोटाने संबंधित ठिकाणी हलकासा दाब द्यावा. दाब देणे शक्य न झाल्यास स्पर्श करावा.

आ. ज्या बोटांनी मुद्रा करायची असते, ती बोटे सोडून उर्वरित बोटे सहजपणे जेवढी शक्य होतील तेवढी सरळ ठेवावीत. बोटे प्रयत्नपूर्वक ताठ (सरळ) ठेवण्याचा प्रयत्न केल्यास नामजपावर लक्ष एकाग्र करता येत नाही.

मुद्रा, न्यास आणि न्यास करण्यासाठीचे
स्थान यांविषयीची प्रायोगिक माहिती

१. पंचतत्त्वे आणि त्यांच्याशी संबंधित मुद्रा अन् न्यास

१ अ. पंचतत्त्वांशी संबंधित हाताची बोटे

तत्त्व हाताचे बोट तत्त्व हाताचे बोट
१. पृथ्वी करंगळी ४. वायु तर्जनी
२. आप अनामिका ५. आकाश अंगठा
३. तेज मधले बोट

१ आ. हाताच्या मुद्रेचा सगुण आणि निर्गुण तत्त्वांशी संबंध

मुद्रेचा प्रकार सगुण-निर्गुण स्तर
१. अंगठ्याचे टोक बोटाच्या टोकाला लावणे सगुण
२. अंगठ्याचे टोक बोटाच्या मुळाशी लावणे सगुण-निर्गुण
३. बोटाचे टोक हाताच्या तळव्याला लावणे निर्गुण-सगुण
४. तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे अधिक निर्गुण-सगुण
५. बोटाचे टोक किंवा हाताचा तळवा न्यास करायच्या ठिकाणापासून १ – २ सें.मी. दूर धरणे पुष्कळ अधिक निर्गुण-सगुण

वरील सारणीवरून मुद्रेनुसार उपाय होण्याची परिणामकारकता वाढण्यातील टप्पे लक्षात येतात, म्हणजे मुद्रेच्या पहिल्या प्रकारापेक्षा दुसरी मुद्रा, दुसर्‍या मुद्रेपेक्षा तिसरी अशा रितीने पुढची पुढची मुद्रा अधिक परिणामकारक ठरते.

१ इ. न्यास करण्याची पद्धत

१ इ १. मुद्रांचा पुढील प्रकारे न्यास करावा !
मुद्रा न्यास
१. अंगठ्याचे टोक बोटाच्या टोकाला लावणे मुद्रेच्या वेळी जोडल्या जाणार्‍या बोटाच्या टोकाने न्यास करावा.
२. अंगठ्याचे टोक बोटाच्या मुळाशी लावणे संबंधित बोटाच्या टोकाने न्यास करावा.
३. बोटाचे टोक तळहाताला लावणे तळहाताने न्यास करावा.
४. तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे अंगठ्याच्या टोकाने न्यास करावा.

शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावरून न्यास करावा !

२. विकार आणि विकारांशी संबंधित कुंडलिनीचक्रे (न्यासस्थाने)

विकार संबंधित कुंडलिनीचक्र 
१. शारीरिक विकार :-

अ. डोके आणि डोळे यांच्याशी संबंधित विकार

आ. नाक, तोंड, कान आणि घसा यांच्याशी संबंधित विकार

इ. छातीशी संबंधित विकार

ई. पोटाशी संबंधित विकार

उ. ओटीपोटाशी संबंधित विकार

ऊ. हात आणि डोक्यापासून छातीपर्यंतच्या भागातील विकार (वरील सूत्रे अ ते इ यांत नमूद केलेल्या अवयवांच्या विकारांव्यतिरिक्त अन्य विकार)

ए. पाय आणि छाती संपून त्याखाली चालू होणारा भाग यांतील विकार (वरील सूत्रे ई आणि उ यांत नमूद केलेल्या अवयवांच्या विकारांव्यतिरिक्त अन्य विकार)

ऐ. संपूर्ण शरिराचा विकार (उदा. थकवा, ताप, स्थूलपणा, अंगभर त्वचारोग)

 

आज्ञाचक्र (भ्रूमध्य, म्हणजे दोन भुवयांच्या मधोमध)

विशुद्धचक्र (कंठ, म्हणजे स्वरयंत्राचा भाग)

अनाहतचक्र (छातीच्या मधोमध)

मणिपुरचक्र (नाभी / बेंबी)

स्वाधिष्ठानचक्र [जननेंद्रियाच्या १ ते २ सें.मी. वर (लिंगमूळ)]

अनाहतचक्र

 

मणिपुरचक्र

 

१. सहस्रारचक्र (डोक्याचा  मध्य, टाळू)

२. अनाहतचक्र आणि मणिपुरचक्र

२. मानसिक विकार १. सहस्रारचक्र
२. अनाहतचक्र

Leave a Comment