दम लागलेला असतांना ॐ नमः शिवाय । हा जप केल्याने दम्याचा त्रास न्यून होणे

२८.४.२०१६ या दिवशी रात्री ११.४५ ला झोपलो असतांना पित्तामुळे छातीत जळजळ होऊ लागली. त्यामुळे मला खोकला येऊ लागला; म्हणून मी पित्तावरचे औषध घेतले. औषधामुळे पित्त शमले; मात्र खोकल्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हा मी ॐ नमः शिवाय । हा जप आणि हाताच्या अंगठ्याचे टोक मध्यमेच्या टोकाशी जोडून मुद्रा केली. १० मिनिटांनी छातीतून येणारा आवाज न्यून होऊन मला थोडी झोप लागली. रात्री जेव्हा जेव्हा मला जाग येत होती, तेव्हा तेव्हा ॐ नमः शिवाय । हा जप आरंभ होत असल्याचे लक्षात येत होते. सकाळपर्यंत श्‍वास लागणे न्यून झाले होते.

 (सनातन संस्थेतर्फे प्रकाशित केलेला ग्रंथ आपत्काळातील संजीवनी – विविध रोगांवर नामजपाचे उपाय या ग्रंथात दम्यावर उपचार म्हणून ॐ नमः शिवाय । हा जप करण्यास सांगितला आहे. – संकलक) 

– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.४.२०१६)

यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment