पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना होणारे त्रास आणि त्यांवरील उपाय

Article also available in :

अनिष्ट शक्तींचा परिणाम पौर्णिमा अमावास्या
१. तीव्रता (टक्के) ३० ते ५० ७०
२. परिणाम टिकण्याचा कालावधी ८ ते १० दिवस महिनाभर अथवा अधिक
३. वैशिष्ट्ये
३ अ. वातावरणावर होणारा परिणाम अधिक प्रमाणात उपासना करून शक्ती मिळवण्याची प्रक्रिया चालू केल्याने वातावरण त्रासदायक स्पंदनांनी युक्त होणे अनिष्ट शक्तींनी सर्वाधिक शक्ती वायूमंडलात (टीप २) प्रसारित करणे आणि यामुळे वातावरण (टीप १) रज-तमयुक्त स्पंदनांनी सर्वाधिक प्रमाणात भारित होणे
३ आ. अनिष्ट शक्तींची क्षमता त्रासदायक स्पंदने ग्रहण करण्याची आणि स्वतःचे बळ वाढवण्याची त्रासदायक स्पंदने प्रसारण करण्याची क्षमता अधिक
४. आक्रमण
४ अ. स्वरूप यंत्र, मंत्र, प्रत्यक्ष करणी, भानामती या रूपांत अधिक, म्हणजेच स्थूल आणि सूक्ष्म स्वरूपांत त्रासदायक लहरींच्या अथवा शक्तीच्या रूपात, म्हणजेच सूक्ष्म स्तरावर अधिक
४ आ. मांत्रिकांचा (बलाढ्य अनिष्ट शक्तींचा) पाताळ क्रमांक तिसरे आणि चौथे पाताळ यांतून आक्रमण होण्याची शक्यता असणे पाचव्या आणि सहाव्या पाताळांतून आक्रमण होण्याची शक्यता अधिक असणे
४ इ. दिशा भूगर्भातून, तसेच भूमीलगतच्या पट्ट्यातून आक्रमण अधिक होणे वरून खालच्या दिशेने, म्हणजेच आकाशमंडलाला प्रधान धरून आक्रमण होणे
४ ई. शारीरिक किंवा बौद्धिक शारीरिक – देहातील उष्णतेचे प्रमाण वाढणे, तोंडाला कोरड पडणे, अंगावर लाल चट्टे येणे, हाडेदुखी चालू होणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे, डोके दुखणे इत्यादी बौद्धिक अधिक – बेशुद्ध होणे, प्राणशक्ती न्यून होणे, भ्रमिष्टता येणे, स्वतःचे अस्तित्व गमावण्याची शक्यता असणे, भोवळ येऊन पडणे, अचानक आक्रमकता येणे, मनात नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढणे, आत्महत्येचे विचार वाढणे इत्यादी
५. उपाय
५ अ. उपायांचे घंटे आणि इतर उपाय न्यूनतम २ घंटे एकाग्र चित्ताने नामजप करणे आवश्यक असणे, तसेच आध्यात्मिक उपायांनाही प्राधान्य देणे महत्त्वाचे असणे साधना तीव्र करण्यासाठी या दिवशी न्यूनतम चार तास बसून एकाग्र चित्ताने नामजप करणे आवश्यक असणे, सतत अनुसंधानाता राहून अनिष्ट शक्तींचे आक्रमण होऊ नये, यासाठी सतर्कता बाळगणे अत्यावश्यक असणे, तसेच उपायांवर भर देऊन, म्हणजेच उदबत्ती लावणे, संतांच्या ध्वनीफीतीतील नादाच्या प्रसारणातून वायूमंडल शुद्ध ठेवणे महत्त्वाचे ठरणे
५ आ. उपायांचा पंचतत्त्वांचा स्तर पृथ्वी ते तेज या तत्त्वांचे उपाय आवश्यक असणे, विभूती लावणे, कापराचा वास घेणे, अत्तर लावणे, तीर्थ शिंपडणे, गोमूत्राने वास्तुशुद्धी करणे महत्त्वाचे असणे अधिकतर आकाशतत्त्वयुक्त उपायांना प्राधान्य देणे महत्त्वाचे असणे, उदा. खोक्यांचे उपाय, संतांची भजने, मार्गदर्शन ऐकणे इत्यादी
६. साधनेची आवश्यकता (व्यष्टी/समष्टी) व्यष्टी साधनेमुळे देहाभोवती संरक्षण कवच टिकल्याने रक्षण होणे शक्य होणे समष्टी साधनेतून कृपेचा ओघ अखंड राहिल्याने मोठ्या आक्रमणांना तोंड देणे शक्य होणे

 

टीप १. वातावरण (घटकवाचक मर्यादितता दर्शवणारा शब्द) : हा शब्द देहवाचक, घटकवाचक, म्हणजेच व्यष्टीवाचक अर्थाने आहे. वातावरण म्हणजे एखाद्या किंवा अनेक घटकांभोवती असलेले सीमितवाचक आवरण. हे आवरण केवळ त्या त्या घटकातील ऊर्जेतून होणार्‍या त्याच्याच बाह्य ऊर्जात्मक आदान-प्रदानाशी संबंधित असते. वातावरण साधारणतः त्या त्या घटकावर परिणाम दर्शवणारे असते.

 

टीप २. वायूमंडल (क्षेत्रवाचक व्यापकता दर्शवणारा शब्द) : हा शब्द व्यापक अर्थाने आहे. वायूमंडल म्हणजे ब्रह्मांडमंडलाच्या व्याप्तीला गृहित धरून असलेले क्षेत्र. वायूमंडल हे संपूर्णतः त्या त्या क्षेत्रालाच एक घटक योजून त्यावर होणार्‍या परिणामाशी निगडित असते. यात अनेक घटक त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी क्षेत्रासह सामावलेले आढळून येतात.

 

– ((पू.) सौ. अंजली गाडगीळ एक विद्वान या टोपण नावाने लिहितात. (११.४.२०१४, सायं. ६.५९))

 

(अनिष्ट शक्ती मनुष्याला त्रास देतात आणि या त्रासांच्या निवारणार्थ अनेक उपाय वेदादी ग्रंथांत सांगितले आहेत. या लेखात हे शब्द त्याच विषयाला अनुसरून आहेत तसेच बलाढ्य अनिष्ट शक्तींना मांत्रिक असे संबोधले आहे. अनिष्ट शक्तींचे अस्तित्व आणि त्याविषयीचे संशोधन यांची माहिती लक्षावधी संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. – संकलक)

 

 

Leave a Comment