आगामी भीषण आपत्काळात स्वतःचे रक्षण होण्यासाठी सर्वांनी प्रतिदिन करावयाचा मंत्रजप

१. प.पू. देवबाबा यांनी हिमालयातील एका
सिद्धांकडून आपत्कालीन मंत्र प्राप्त होण्यासंबंधी सांगितलेली सूत्रे

मूळचे कर्नाटक येथील आणि हिमालयवासी त्रिकाल ज्ञानी अवधूत श्री नारायण अप्पा या सिद्धांची माझी एकदा हिमालयात भेट झाली. तेव्हा त्यांनी मला हा मंत्र दिला. ते मला म्हणाले, पुढे जलप्रलय आणि तिसरे महायुद्ध होणार आहे. त्या वेळी स्वतःचे रक्षण होण्यासाठी हा मंत्र लाभदायी आहे. त्यांनी मला दीक्षा देऊन हा मंत्र शिकवला.

 

२. प.पू. देवबाबा यांनी सांगितलेले आपत्कालीन मंत्राचे वैशिष्ट्य

आगामी काळात आपत्काळ, तिसरे महायुद्ध, भूकंप, त्सुनामी, बॉम्बचा दुष्परिणाम अथवा जलप्रलय होणार असल्याने हिमालयातील सिद्धांनी मला हा मंत्र दिला. हा मंत्र म्हटल्याने आपत्काळातील विविध संकटांपासून आपले रक्षण होऊ शकते. या मंत्राने आरोग्य मिळेल.
आपत्काळ आल्यानंतर हा मंत्रजप करायचा नसून तो आतापासून करायचा आहे. गेल्या २० वर्षांपासून हा मंत्र मी प्रतिदिन करत आहे. हा मंत्र आतापर्यंत मी कुणालाही सांगितलेला नव्हता. हा मंत्र केवळ ऐकायचा नसून तो स्वतः म्हणायचा आहे. हा मंत्र स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, प्राणशक्ती आणि तेजोमय आत्म्याशी संबंधित आहे.

 

३. आपत्काळात रक्षण होण्यासाठी प्रतिदिन म्हणायचा मंत्र

ॐ र्‍हीं क्लीं श्रींं नमः शिवाय परब्रह्मणे नमः ।

 

४. मंत्र म्हणण्याची पद्धत

प्रथम स्वतःची उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्‍वास घेत ॐ मनात म्हणणे, त्यानंतर डावी नाकपुडी बंद करून तोंडाने र्‍हीं क्लीं श्रींं म्हणत उजव्या नाकपुडीने श्‍वास सोडणे, त्यानंतर डावी नाकपुडी बंद ठेवत उजव्या नाकपुडीने नमः शिवाय मनात म्हणत श्‍वास घेणे आणि त्यानंतर उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्‍वास सोडत परब्रह्मणे नमः असे मनात म्हणणे.

 

५. हा मंत्रजप प्रतिदिन १०१ वेळा करायचा आहे.

६. मंत्रजप म्हणण्याची वेळ

सूर्योदयापूर्वी केलेले चांगले किंवा सकाळी अथवा रात्री झोपण्यापूर्वी रिकाम्या पोटी करावा.

७. वरील मंत्र म्हणणे शक्य नसल्यास गायत्री मंत्र प्रतिदिन एकदा १०८ वेळा म्हणावा. हा मंत्र सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी रिकाम्या पोटी करावा.

८. वरील दोन्ही मंत्र आपत्काळाच्या दृष्टीने असल्याने सोयर-सुतक किंवा स्त्रियांच्या मासिक पाळीचेही याला बंधन नाही.

९. हा मंत्र यांत्रिक पद्धतीने न करता भक्तीने आणि शरणागतीपूर्वक केल्यास त्याचा आध्यात्मिक लाभ होणार आहे.

१०. हा मंत्र राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, साधक आणि सनातनचे संत यांच्यासाठी आहे.

टीप : वरील दोन मंत्रांपैकी कुठलाही एक मंत्र साधकांनी प्रतिदिन करायचा आहे.

 

Leave a Comment