नामजप करतांना करायच्या मुद्रा आणि न्यास, तसेच न्यास करण्यासाठीचे स्थान समजून घेणे

मुद्रा, न्यास आणि न्यास करण्यासाठीचे
स्थान यांविषयीची प्रायोगिक माहिती

१. पंचतत्त्वे आणि त्यांच्याशी संबंधित मुद्रा अन् न्यास

१ अ. पंचतत्त्वांशी संबंधित हाताची बोटे

तत्त्व हाताचे बोट तत्त्व हाताचे बोट
१. पृथ्वी करंगळी ४. वायु तर्जनी
२. आप अनामिका ५. आकाश अंगठा
३. तेज मधले बोट

१ आ. हाताच्या मुद्रेचा सगुण आणि निर्गुण तत्त्वांशी संबंध

मुद्रेचा प्रकार सगुण-निर्गुण स्तर
१. अंगठ्याचे टोक बोटाच्या टोकाला लावणे सगुण
२. अंगठ्याचे टोक बोटाच्या मुळाशी लावणे सगुण-निर्गुण
३. बोटाचे टोक हाताच्या तळव्याला लावणे निर्गुण-सगुण
४. तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे अधिक निर्गुण-सगुण
५. बोटाचे टोक किंवा हाताचा तळवा न्यास करायच्या ठिकाणापासून १ – २ सें.मी. दूर धरणे पुष्कळ अधिक निर्गुण-सगुण

वरील सारणीवरून मुद्रेनुसार उपाय होण्याची परिणामकारकता वाढण्यातील टप्पे लक्षात येतात, म्हणजे मुद्रेच्या पहिल्या प्रकारापेक्षा दुसरी मुद्रा, दुसर्‍या मुद्रेपेक्षा तिसरी अशा रितीने पुढची पुढची मुद्रा अधिक परिणामकारक ठरते.

१ इ. न्यास करण्याची पद्धत

१ इ १. मुद्रांचा पुढील प्रकारे न्यास करावा !
मुद्रा न्यास
१. अंगठ्याचे टोक बोटाच्या टोकाला लावणे मुद्रेच्या वेळी जोडल्या जाणार्‍या बोटाच्या टोकाने न्यास करावा.
२. अंगठ्याचे टोक बोटाच्या मुळाशी लावणे संबंधित बोटाच्या टोकाने न्यास करावा.
३. बोटाचे टोक तळहाताला लावणे तळहाताने न्यास करावा.
४. तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे अंगठ्याच्या टोकाने न्यास करावा.

शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावरून न्यास करावा !

२. विकार आणि विकारांशी संबंधित कुंडलिनीचक्रे (न्यासस्थाने)

विकार संबंधित कुंडलिनीचक्र 
१. शारीरिक विकार :-

अ. डोके आणि डोळे यांच्याशी संबंधित विकार

आ. नाक, तोंड, कान आणि घसा यांच्याशी संबंधित विकार

इ. छातीशी संबंधित विकार

ई. पोटाशी संबंधित विकार

उ. ओटीपोटाशी संबंधित विकार

ऊ. हात आणि डोक्यापासून छातीपर्यंतच्या भागातील विकार (वरील सूत्रे अ ते इ यांत नमूद केलेल्या अवयवांच्या विकारांव्यतिरिक्त अन्य विकार)

ए. पाय आणि छाती संपून त्याखाली चालू होणारा भाग यांतील विकार (वरील सूत्रे ई आणि उ यांत नमूद केलेल्या अवयवांच्या विकारांव्यतिरिक्त अन्य विकार)

ऐ. संपूर्ण शरिराचा विकार (उदा. थकवा, ताप, स्थूलपणा, अंगभर त्वचारोग)

 

आज्ञाचक्र (भ्रूमध्य, म्हणजे दोन भुवयांच्या मधोमध)

विशुद्धचक्र (कंठ, म्हणजे स्वरयंत्राचा भाग)

अनाहतचक्र (छातीच्या मधोमध)

मणिपुरचक्र (नाभी / बेंबी)

स्वाधिष्ठानचक्र [जननेंद्रियाच्या १ ते २ सें.मी. वर (लिंगमूळ)]

अनाहतचक्र

 

मणिपुरचक्र

 

१. सहस्रारचक्र (डोक्याचा  मध्य, टाळू)

२. अनाहतचक्र आणि मणिपुरचक्र

२. मानसिक विकार १. सहस्रारचक्र
२. अनाहतचक्र

मुद्रा, न्यास आणि न्यास
करण्यासाठीचे स्थान समजून घेऊन उपाय करणे

१. यात बहुतेक नामजपांच्या पुढे कंसात नामजपाशी संबंधित महाभूत (तत्त्व) दिले आहे, उदा. श्री विष्णवे नमः । (आप).

२. त्या तत्त्वाशी संबंधित मुद्रेसाठी उपयुक्त हाताचे बोट ‘सूत्र १ अ.’ वरून समजून घ्यावे.
अ. नामजप एकाच तत्त्वाशी संबंधित असल्यास [उदा. श्री विष्णवे नमः । (आप)] ‘सूत्र १ आ.’ नुसार पहिली मुद्रा करावी. ही मुद्रा काही घंटे / दिवस करूनही विशेष लाभ न जाणवल्यास टप्प्याटप्प्याने पुढच्या पुढच्या मुद्रा तशाच कालावधीच्या अंतराने करून पहाव्यात. शेवटची मुद्रा करूनही विशेष लाभ जाणवत नसेल, तरी श्रद्धेने ती मुद्रा करत रहावी; कारण उपायांचा परिणाम होण्याची गती ही व्यक्तीच्या प्रकृतीनुसार मुद्रेचा व्यक्तीवर होणारा परिणाम, विकाराची तीव्रता आदी घटकांवर अवलंबून असते.

आ.  नामजप एकापेक्षा जास्त तत्त्वांशी संबंधित असल्यास [उदा. श्री गणेशाय नमः । (पृथ्वी, आप)] ‘सूत्र  १ आ.’ नुसार प्रत्येक तत्त्वाची पहिली मुद्रा करून पहावी. दोन्हींपैकी कोणती मुद्रा करतांना जास्त चांगले वाटते किंवा जास्त उपाय होतात, ते ठरवावे अन् तीच मुद्रा करावी. निवडलेल्या तत्त्वाची ही पहिली मुद्रा काही घंटे / दिवस करूनही विशेष लाभ न जाणवल्यास ‘सूत्र १ आ.’ नुसार टप्प्याटप्प्याने पुढच्या पुढच्या मुद्रा करून पहाव्यात.

इ. नामजप आकाशतत्त्वाशी संबंधित असल्यास ‘सूत्र १ आ.’ नुसार थेट चौथी, म्हणजे तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे ही मुद्रा करावी. या मुद्रेने लाभ न झाल्यास त्यापुढील मुद्रा करावी.

३. मुद्रेनुसार न्यास कसा करावा, हे ‘सूत्र १ इ १.’ यावरून समजून घ्यावे.

४. नामजपाशी संबंधित तत्त्वाऐवजी कंसात * असे चिन्ह दिले असेल, तर पाचही बोटांची टोके एकत्र जुळवणे ही मुद्रा करून त्या बोटांच्या टोकाने न्यास करावा. दोन-तीन तत्त्वांपैकी एखादे तत्त्व निवडणे अवघड वाटत असल्यासही हीच मुद्रा आणि न्यास करावा.

५. ‘२’ मध्ये दिलेल्या सारणीवरून विकारानुसार न्यास करण्यासाठीचे स्थान समजून घेऊन त्या स्थानी न्यास करत नामजप करावा.

 अ. या मध्ये काही विकारांमध्ये विशेष न्यासस्थानही दिले आहे. त्या त्या विकारात ‘२’ मध्ये दिलेल्या सारणीतील न्यासस्थान आणि विशेष न्यासस्थान या दोन्हींपैकी ज्या ठिकाणी न्यास केल्याने जास्त लाभ होतो, असे जाणवेल, त्या ठिकाणी न्यास करत नामजप करावा.

आ. इंद्रिये किंवा अवयव यांच्या स्थानी त्रास जाणवत असल्यास त्या स्थानीही न्यास करावा. शक्यतो न्यास करण्यासाठी प्रथम प्राधान्य कुंडलिनीचक्रे, नंतर शरिराचे विविध भाग आणि त्यानंतर नवद्वारे, असे ठेवावे. मात्र एखाद्या ठिकाणी अधिक त्रास जाणवत असल्यास, उदा. शरिराचा एखादा भाग दुखत असल्यास, प्रथम प्राधान्याने तेथे न्यास
करावा.

संदर्भ : विकार-निर्मूलनासाठी नामजप भाग १ : महत्त्व आणि नामजपाच्या विविध प्रकारांमागील शास्त्र भाग २ : विकारांनुसार देवतांचे जप, बीजमंत्र आदींसह मुद्रा अन् न्यासही !