स्त्रियांनो, मासिक धर्माशी संबंधित त्रास होत असल्यास पुढील आध्यात्मिक उपाय करा !

Article also available in :

सध्याच्या काळात बर्‍याच स्त्रियांना मासिक धर्माशी संबंधित त्रास होत आहेत. यामध्ये रजस्राव अधिक प्रमाणात होणे, रजस्राव प्रतिमास न होता अनियमित होणे, २० व्या दिवशी रजस्राव चालू होऊन तो १५ दिवस रहाणे, असे त्रास होत आहेत. त्यामुळे मासिक धर्माच्या संदर्भात त्रास होत असल्यास स्त्रिया पुढील आध्यात्मिक उपाय करु शकतात. यासंदर्भात काही औषधे चालू असल्यास ती बंद न करता त्याच्या जोडीला हे आध्यात्मिक उपाय करु शकतो.

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

 

१. नामजपाचे मंडल काढून त्यात लिहावयाची प्रार्थना

मासिक धर्म चालू होण्याच्या दिनांकाच्या ४ दिवस आधी कागदावर श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल काढावे आणि त्यामध्ये पुढील प्रार्थना लिहावी, ‘हे श्रीकृष्णा, …….. (येथे स्वतःचे नाव लिहावे.) हिला मासिक धर्माच्या संदर्भात ……. (जे त्रास होत आहेत, ते येथे लिहावेत.) हे त्रास होत आहेत. हे त्रास दूर होऊ देत आणि मला दिलेली सेवा अन् साधना करता येऊ दे. तिच्यामध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत.’

रजस्राव थांबल्यावर नामजपाचे मंडल केलेला कागद अग्नीमध्ये विसर्जित करावा. पुढच्या मासामध्ये असे नामजपाचे मंडल पुन्हा बनवावे आणि त्यात प्रार्थना लिहावी. हे उपाय मासिक धर्म नियमित होईपर्यंत प्रतिमास करावेत.

 

२. या काळात करावयाची मुद्रा, न्यास आणि नामजप

२ अ. मुद्रा आणि न्यास : अंगठ्याचे टोक तर्जनीच्या मुळाशी लावून सिद्ध होणारी मुद्रा दोन्ही हातांनी करून एका हाताच्या तर्जनीच्या टोकाने स्वाधिष्ठानचक्र आणि दुसर्‍या हाताच्या तर्जनीच्या टोकाने आज्ञाचक्र या ठिकाणी न्यास करणे

२ आ. नामजप : वरील मुद्रा आणि न्यास करून त्यांसह ‘ॐ ॐ श्री वायुदेवाय नमः ॐ ॐ ।’ हा नामजप त्रास होत असतांना किंवा मासिक धर्माच्या दिनाच्या ४ दिवस आधीपासून ते मासिक धर्माचा ५ दिवसांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत प्रतिदिन २ घंटे करावा.

२ इ. हे उपाय करूनही रजस्राव थांबत नसेल किंवा त्याचे प्रमाण अधिक असेल, तर ‘ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ ।’ हा नामजप करावा, तसेच तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी टेकवून सिद्ध होणारी मुद्रा दोन्ही हातांनी करून एका हाताच्या अंगठ्याच्या टोकाने स्वाधिष्ठानचक्र आणि दुसर्‍या हाताच्या अंगठ्याच्या टोकाने आज्ञाचक्र या ठिकाणी न्यास करावा.

मासिक धर्माच्या वेळी असे त्रास नेहमी होत असल्यास प्रत्येक वेळी वरील उपाय करावेत.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०१९)

Leave a Comment