सर्व साधकांनी प्रतिदिन स्वतःसमवेत ‘रक्षायंत्र’ बाळगावे !

‘सध्या आपत्काळाची तीव्रता अधिक असल्याने साधकांवर स्थुलातून आणि सूक्ष्मातून आक्रमणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व साधकांनी प्रतिदिन स्वतःसमवेत ‘रक्षायंत्र’ बाळगावे. या संदर्भातील सूचना खाली दिल्या आहेत.

१. कोर्‍या कागदावर रक्षायंत्राची प्रत काढावी. त्यावर मध्यभागी गोलात जेथे ‘नाम’ असे लिहिले आहे, तेथे स्वतःचे नाव लिहावे.

२. या रक्षायंत्राचा शरिराला सतत स्पर्श व्हावा, या दृष्टीने ते ताईतामध्ये घालावे. ते ताईत लाल वा काळ्या रंगाच्या दोर्‍याने गळ्यात वा हातात बांधावे.

३. प्रतिदिन उदबत्तीने धूप दाखवून या यंत्राची शुद्धी करावी.

४. साधिकांनी मासिक पाळीच्या वेळी हे यंत्र समवेत बाळगू नये. मासिक पाळीचा कालावधी संपल्यानंतर उदबत्तीने शुद्धी करून बाळगावे.’

– (परात्पर गुुरु) पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.८.२०१८)

Leave a Comment