प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय गांभीर्याने करा !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितलेले आध्यात्मिक उपाय म्हणजे संकटकाळात जिवंत रहाण्याची संजीवनीच आहे’, हे ध्यानात घेऊन सर्व उपाय गांभीर्याने करा !

‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय होतील, असे साधकांनी पहावे.

 

१. नामजप

‘कोरोना विषाणूंविरुद्ध सर्व वैद्यकीय उपचार करावेत तसेच शासनाचे नियम पाळावेत याबराेबर आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता आध्यात्मिक बळ मिळावे’, यासाठी पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप (‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमः शिवाय ।’) प्रतिदिन १०८ वेळा करावा.

हा नामजप www.sanatan.org/mr/helpful_chant_in_corona येथे उपलब्ध आहे

 

२. स्तोत्रपठण

आपत्काळात रक्षण होण्यासाठी प्रतिदिन सकाळी चंडीकवच (देवीकवच), तर सायंकाळी ‘बगलामुखी दिग्बन्धन स्तोत्र’ ऐकावे. ही स्तोत्रे https://www.sanatan.org/mr/stotra या संगणकीय मार्गिकेवर उपलब्ध आहेत.

 

३. ‘रक्षायंत्र’ आणि रामकवच धारण करणे

परात्पर गुुरु पांडे महाराज यांच्या आज्ञेप्रमाणे प्रतिदिन ‘रक्षायंत्र’ बाळगावे, तसेच रामकवच धारण करावे. रक्षायंत्र आणि रामकवच यांचे धागे, तसेच ताईतमधील रक्षायंत्राची प्रत प्रत्येक २ मासांनी पालटावी. जुने धागे आणि रक्षायंत्राची प्रत अग्नीत विसर्जित करून नवीन धागे अन् प्रत ताईतमध्ये घालावी. रक्षायंत्राचा ताईत पालटण्याची आवश्यकता नाही.

रक्षायंत्राची प्रत आणि त्या संदर्भातील सूचना सर्वांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी  https://www.sanatan.org/mr/a/70765.html  संगणकीय मार्गिकेवर ठेवली आहे.

 

४.  ‘निर्गुण’ या नामजपाच्या पट्ट्या लावणे

प्रतिदिन उदबत्तीने शुद्धी करून सहस्रार आणि विशुद्ध या चक्रांवर ‘निर्गुण’ या नामजपाच्या पट्ट्या लावाव्यात.

 

५. प्रति एक घंट्याने उदबत्ती किंवा ‘सनातन प्रभात’ यांच्या
साहाय्याने अथवा स्वतःच्या हातांनी सप्तचक्रांवरील आवरण काढणे

प्रति एक घंट्याने सहस्रार ते स्वाधिष्ठान चक्रांवरील त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण २ – ३ मिनिटे काढावे. आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांनी उदबत्ती किंवा नियतकालिक ‘सनातन प्रभात’ यांच्या साहाय्याने, तर त्रास नसणार्‍या साधकांनी स्वतःच्या हातांनी आवरण काढावे. यानंतर ‘भीमसेनी’ कापराचा सुगंध घेऊन उपाय करावेत. ‘माझ्या देहाची शुद्धी होऊन मला उत्साह वाटू दे’, अशी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करावी.

साधकांच्या साधनेत खंड पाडून त्यांना त्रास देण्यासाठी अनिष्ट शक्ती येनकेन प्रकारेण प्रयत्न करत आहेत. संकटकाळात तर हे त्रास अधिकच वाढत असल्याने या काळात सर्वांनी आध्यात्मिक उपाय करणे अनिवार्य आहे.

साधकांनो, सर्वशक्तीमान ईश्‍वर आपल्यासह असल्याने प्रतिकूल परिस्थितीत डगमगून न जाता स्थिर राहून श्रद्धेने सर्व आध्यात्मिक उपाय करा !’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.४.२०२०)
साधकांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात ‘स्वतःकडून वरील सर्व आध्यात्मिक उपाय नियमितपणे होतात का ?’, याचा आढावा आढावासेवकांना द्यावा.

 

६. वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण व्हावे’, यासाठी रुग्णालयातील रुग्ण,रुग्णाचे
नातेवाईक, आधुनिक वैद्य, परिचारिका इत्यादी सर्वांनी अधिकाधिक नामजप करावा !

‘रुग्णालयात रुग्णांचे विविध कारणांनी मृत्यू होतात, उदा. अपघातग्रस्त, दीर्घकाळ रुग्णाईत असलेले रुग्ण, अकाली मृत्यू झालेले; तसेच लहान मुले इत्यादी. मृत्यूनंतर प्रत्येकाला लगेच पुढील गती मिळतेच, असे नाही. त्यांपैकी अतृप्त लिंगदेह किंवा वाईट लिंगदेह त्या रुग्णालयातील आधुनिक वैद्य, परिचारिका, स्वच्छता करणारे कर्मचारी, उपचारांसाठी आलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक इत्यादींना त्रास देऊ शकतात. रुग्णालयात विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या रुग्णांमुळे सर्व जण तेथील वातावरणातील अस्वस्थता आणि तणाव अनुभवत असतात.

‘वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी ‘भगवंताचे नामस्मरण करणे’, हा सर्वाधिक प्रभावी उपाय आहे’, असे सनातन धर्मात आणि अनेक संतांनी सांगितलेले आहे. त्यामुळे आधुनिक वैद्य, परिचारिका, स्वच्छता करणारे कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक यांनी रुग्णालयात असतांना अधिकाधिक नामजप करावा. त्याचा लाभ उपचारांसाठी आलेल्या रुग्णांनाही आपोआप होईल. रुग्णालयातील इतरांनी रुग्णांनाही नामजप करण्याची आठवण करून द्यावी. नामस्मरणाने मनोबल वाढते, मनःशांती मिळते आणि जीवन आनंदी होण्यास साहाय्य होते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.२.२०२३)

Leave a Comment