मंदिरांतील पुजार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

मंदिरांतील पुजार्‍यांनी आपण देवाचे भक्त आहोत आणि मंदिरात येणार्‍यांना भक्ती करायला शिकवणे, ही आपली साधना आहे, या दृष्टीने आपल्या पुजारीपणाकडे पाहिले पाहिजे. असे केले, तरच समाजाला पुजारी आपले वाटतील आणि त्यांचीही प्रगती होईल. – डॉ. आठवले (२३.१.२०१४)

…आणि माझा अहं अल्प झाला !

आतापर्यंत डॉ. आठवले यांनी सनातन संस्था स्थापन केली, अशी संस्थेची ओळख करून दिली जायची. आता सनातन संस्थेचे डॉ. आठवले, असे मला ओळखतात ! – डॉ. आठवले (वैशाख कृष्ण पक्ष दशमी, कलियुग वर्ष ५११५ (३.६.२०१३))

सात्त्विक छंद जोपासण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने तन-मन-धनाचा त्याग करणे म्हणजे साधना !

काही जणांना क्रिकेटचा, काही जणांना गाण्याचा, काही जणांना नृत्याचा, काही जणांना फिरायला बाहेरगावी जाण्याचा, असे विविध छंद असतात. त्याचप्रमाणे काही जणांना तीर्थक्षेत्री जाण्याचा, काही जणांना भजन, कीर्तन किंवा प्रवचन यांना जाण्याचा, तर काही जणांना संतांकडे जाण्याचा छंद असतो. आधीच्या छंदांपेक्षा हे छंद बरे असले, तरी त्याच्यामुळे होणारी एक हानी, म्हणजे आपण साधना करतो, या भ्रमात … Read more

स्थुलातून पूजा, साष्टांग नमस्कार इत्यादी कृती करण्यापेक्षा त्या मनाने केल्यास अधिक लाभ होणे

याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. स्थुलातून कृती करत असतांना देहाकडेही लक्ष द्यावे लागते. त्याच कृती मनाने करतांना तसे लक्ष द्यावे लागत नाही. त्यामुळे त्या कृती एकाग्रतेने आणि भावपूर्ण करणे सुलभ होते. २. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे. सूक्ष्मतम ईश्‍वराकडे जाण्यासाठी साधना सूक्ष्मातून करणे अधिक महत्त्वाचे आहे. – डॉ. आठवले (वैशाख अमावास्या, कलियुग वर्ष ५११५ (८.६.२०१३))

हल्लीच्या कुटुंबांची केविलवाणी स्थिती !

एकुलता एक मुलगा असला की, वडिलांची सर्व संपत्ती मिळते; पण भावंडांबरोबर कसे रहायचे ? भावंडांचे प्रेम म्हणजे काय ?, हे शिकायला मिळत नाही. पुढे आई-वडिलांचे सर्व उत्तरदायित्वही सांभाळावे लागते. ते नको असल्याने हल्लीची मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. साधना केल्यास मुले कृतज्ञतापूर्वक आई-वडिलांचे शेवटपर्यंत सर्व करतात आणि त्यांच्या मुलांसमोरही एक आदर्श ठेवतात. – डॉ. आठवले … Read more

मायेतील सूक्ष्मातील कळणेही निरर्थक असणे

काही जणांना वनस्पती, पशू-पक्षी, इतकेच काय, तर निर्जीव वस्तूही काय बोलतात, हे कळते. ते आयुष्यभर त्यातच रममाण होतात. हा झाला सिद्धीचा एक प्रकार. मायेतील स्थुलातील कळणे जसे ईश्‍वरप्राप्तीच्या संदर्भात निरर्थक असते, तसेच मायेतील सूक्ष्मातील कळणेही निरर्थक असते. – डॉ. आठवले (चैत्र शुक्ल पक्ष दशमी, कलियुग वर्ष ५११५ (२१.४.२०१३))

कोणता जयघोष कधी करावा ?

१. लढ्याचा आरंभ होतांना आणि चालू असतांना : हर हर महादेव । २. लढा जिंकल्यावर : जयतु जयतु हिंदू राष्ट्रम् । या सूचनेत प्रसंगानुसार पालट करता येईल.- डॉ. आठवले (३१.१२.२०१३)

धर्मशिक्षण न देता, केवळ कायद्याने सुव्यवस्था आणू, असे म्हणणारे राज्यकर्ते मूर्खांच्या नंदनवनात रहात आहेत !

सत्ययुगात कायदेच नव्हते, म्हणजे त्यांची आवश्यकताच नव्हती; कारण प्रत्येक जण नीतीवान होता. त्रेतायुगात थोडेफार कायदे होते; पण त्यांची आवश्यकता फारच अल्प होती. द्वापरयुगापासून कलियुगापर्यंत कायद्यांची संख्या वाढत गेली आहे. प्रत्यक्षात कितीही कायदे केले आणि कायद्यांनुसार कितीही कडक शिक्षा केल्या, तरी त्यांचा गुन्हेगारांवर काहीही परिणाम होत नाही, हे पुनःपुन्हा तेच गुन्हे करणार्‍यांवरून सिद्ध झाले आहे. धर्मशिक्षणाच्या … Read more

खेडेगावात रहाणारे निरोगी आणि आनंदी लोक, तर शहरात रहाणारे व्याधीग्रस्त लोक !

शहरात रहाणारे लोक मायेच्या आधीन जीवन जगत असतात. बहुतेकजण या मायेच्या चक्रामध्ये देवाला विसरलेले असतात. अनेक सुखसुविधांमुळे त्यांच्या शरिराला कष्ट करायची सवय रहात नाही. तसेच प्रलोभने आणि स्वार्थ यांमुळे त्यांची वृत्ती संकुचित आणि प्रेमभाव नसलेली बनते. त्यामुळे त्यांच्या मनातील निर्मळता आणि आनंद लोप पावलेला असतो आणि त्यांचे मन तणावानेच ग्रस्त असते. तसेच शरिराला कष्टाची सवय … Read more

हिंदूंना धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता !

हिंदु धर्माचा अभ्यास आणि साधना नसल्याने हिंदूंना धर्माचे महत्त्व कळत नाही. त्यामुळे कोणी हिंदु राष्ट्राची स्थापना करा. हिंदु धर्माचा जगभर प्रसार करा, असे म्हणत नाही. आजार्‍याला औषधाचे महत्त्व कळते. औषधांहून हिंदु धर्म अनंत पटींनी श्रेष्ठ आहे. औषधे केवळ काही वेळा आजार बरा करतात; पण मृत्यूपासून सुटका करू शकत नाहीत. याउलट धर्म भवरोगातून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या आजारातून … Read more