खेडेगावात रहाणारे निरोगी आणि आनंदी लोक, तर शहरात रहाणारे व्याधीग्रस्त लोक !

शहरात रहाणारे लोक मायेच्या आधीन जीवन जगत असतात. बहुतेकजण या मायेच्या चक्रामध्ये देवाला विसरलेले असतात. अनेक सुखसुविधांमुळे त्यांच्या शरिराला कष्ट करायची सवय रहात नाही. तसेच प्रलोभने आणि स्वार्थ यांमुळे त्यांची वृत्ती संकुचित आणि प्रेमभाव नसलेली बनते. त्यामुळे त्यांच्या मनातील निर्मळता आणि आनंद लोप पावलेला असतो आणि त्यांचे मन तणावानेच ग्रस्त असते. तसेच शरिराला कष्टाची सवय न उरल्याने त्यांना शारीरिक व्याधीही जडलेल्या असतात. याउलट खेडेगावातील लोक निर्मळ आणि प्रेमळ असतात. ते कष्टाळू आणि मायेच्या प्रलोभनांपासून दूर असल्याने, तसेच त्यांच्यात देवावर श्रद्धा असल्याने त्यांच्या तोंडवळ्यावर आनंद दिसून येतो. ते निरोगी असतात. (प.पू.) डॉ. आठवले (२३.१२.२०१३)

Leave a Comment