बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, बुद्धीची मर्यादा लक्षात घ्या !

बुद्धीप्रामाण्यवादी आयुष्यभर बुद्धीने मायेतील स्थूल गोष्टींचा शोध घेत रहातात, तरी त्यांना त्यासंदर्भात अतिशय अत्यल्प आणि तेही फक्त वर्तमान स्थितीतील कळते. त्यांना स्थूल गोष्टींतील चिरंतन तत्त्व कळत नाही. याचे कारण हे की, साधना नसल्यामुळे त्यांना विश्‍वबुद्धीचे साहाय्य होत नाही. त्यामुळे त्यांचे विचार आणि संशोधनही ५० – ६० वर्षांनी कोणाला ज्ञात नसते. याउलट अनादी वेद विश्‍वबुद्धीतून ग्रहण … Read more

कर्तेपण श्रीकृष्णाला अर्पण करणे आवश्यक !

श्रीकृष्ण माझ्या रूपात अनुभूती देतो. साधकांना वाटते, प.पू. डॉक्टरांमुळे अनुभूती आल्या. यातून शिकण्यासारखे हे की, श्रीकृष्णाने अनुभूती दिल्या, तरी तो कर्तेपण मला देतो. साधकांनीही हे लक्षात ठेवून प्रत्येक कृतीचे कर्तेपण श्रीकृष्णाला अर्पण केले पाहिजे. – डॉ. आठवले (वैशाख शुक्ल पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११५ (२२.५.२०१३))

प्रार्थनेचे टप्पे

१. अहं न्यून करण्यासाठी प्रार्थना आवश्यक असते. प्रार्थना करतांना काहीतरी स्वेच्छा असते. अगदी विश्‍वासाठी प्रार्थना केली, तरी तिच्यात स्वेच्छा असते. २. पुढे ईश्‍वरेच्छेवर सगळे सोडल्यावर प्रार्थनेऐवजी मनाला निर्विचार स्थिती आणि शांती अनुभवता येते. – डॉ. आठवले (आषाढ कृष्ण पक्ष ११, कलियुग वर्ष ५११५ (२.८.२०१३))

पहाण्यापेक्षा ऐकणे अधिक महत्त्वाचे !

पहाणे हे तेजतत्त्वाच्या स्तरावरील असते, तर ऐकणे हे आकाशतत्त्वाच्या स्तरावरील असते. त्यामुळे पहाण्यापेक्षा ऐकण्यात अधिक आनंद असतो. एखादी कलाकृती किंवा व्यक्ती कितीही सुंदर असली, तरी तिच्याकडे अधिक काळ पहाता येत नाही. त्याचे आणखीन एक कारण म्हणजे तेथे विषय एकच रहातो. याउलट आकाशतत्त्वाच्या स्तरावर विविध विषयांवर बोलता येते; म्हणूनच चित्रे किंवा मूक चित्रपट यांच्यापेक्षा आकाशवाणी अधिक … Read more

हिंदूंनो, विश्‍वाआधी स्वतःला सुसंस्कृत करा !

हिंदू नेहमी ऋग्वेदातील कृण्वन्तो विश्‍वम् आर्यम् ।, म्हणजे संपूर्ण विश्‍वाला आर्य, म्हणजे सुसंस्कृत करू असे अभिमानाने म्हणतात. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्याचा आरंभ स्वतःपासूनच केला पाहिजे. कृण्वन्तो स्वम् आर्यम् ।, म्हणजे स्वतःला सुसंस्कृत करू, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे लोकां सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥ अशी त्यांची स्थिती होणार नाही … Read more

भक्तांना आरसे महाल अनावश्यक !

पूर्वीच्या काळी राजवाड्यात आरसे महाल असत. महालात व्यक्ती कुठेही असली, तरी ती दिसते. त्यामुळे ती सर्वत्र आहे, असे दिसायचे. भक्तांना आरसे महाल तयार करावा लागत नाही; कारण त्यांना देव केवळ सर्वत्रच नाही, तर स्वतःमध्येही दिसतो. – डॉ. आठवले (२८.१०.२०१३)

देवघरात देवतांची जुनी चित्रे आणि मूर्ती ठेवू नका !

‘काही जणांकडे ३-४ पिढ्यांपूर्वीचीही देवघरातील देवतांची जुनी चित्रे आणि मूर्ती पूजेत ठेवलेली असतात. चित्रे आणि मूर्ती जुनी झाल्यामुळे त्यांच्यातील देवतेचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अल्प झालेली असते. एवढेच नव्हे, तर काही वेळा त्यांतून त्रासदायक स्पंदनेही प्रक्षेपित होतात. भावनाप्रधानतेमुळे अशी चित्रे आणि मूर्ती देवघरात ठेवण्यात येतात. अशांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, मंदिरातील मूर्तीचीही … Read more

साधनेत केवळ तन-मन-धनाचा त्याग पुरेसा नाही, तर इतरही अनेक गुण हवेत !

साधनेत तन-मन-धनाचा त्याग केला की झाले, असे बर्‍याच ६० टक्क्यांहून अधिक पातळीच्या साधकांना आणि काही संतांनाही वाटते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, साधनेत पुढे जायची तळमळ, जिज्ञासा, शिकण्याची वृत्ती, प्रीती आणि समष्टीतील नेतृत्व इत्यादी गुणही अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशिवाय पुढील प्रगती होणे अशक्य आहे. एवढेच नव्हे, तर या गुणांशिवाय अधोगतीही होऊ शकते. – डॉ. … Read more

स्वसंरक्षण करण्यासाठी साधनेचे महत्त्व

शिरस्त्राण, चिलखत इत्यादी स्थुलातून आक्रमण झाल्यास त्या त्या भागाचे रक्षण करतात. साधनेमुळे संरक्षककवच निर्माण होते. ते स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवरच्या आक्रमणांपासून पूर्ण देहाचे आणि मनाचे रक्षण करते. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष १३, कलियुग वर्ष ५११५ (२१.६.२०१३))

स्वतःपेक्षा इतरांकडे पहाण्याची कारणे

व्यक्ती कितीही सुंदर असली, तरी ती आरशात स्वतःकडे फारच थोडा वेळ पहाते. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. अतिपरिचयात् अवज्ञा ।, म्हणजे (आरशात पहाणे) नेहमीचेच झाल्याने त्याचे काही अप्रूप वाटत नाही. २. बहुतेक सर्वच जण बहिर्मुख असल्यामुळे स्वतःकडे पहाण्यापेक्षा त्यांना इतरांकडे पहाणे जास्त आवडते. – डॉ. आठवले (आषाढ शुक्ल पक्ष ५, कलियुग वर्ष ५११५ (१३.७.२०१३))