सात्त्विक छंद जोपासण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने तन-मन-धनाचा त्याग करणे म्हणजे साधना !

काही जणांना क्रिकेटचा, काही जणांना गाण्याचा, काही जणांना नृत्याचा, काही जणांना फिरायला बाहेरगावी जाण्याचा, असे विविध छंद असतात. त्याचप्रमाणे काही जणांना तीर्थक्षेत्री जाण्याचा, काही जणांना भजन, कीर्तन किंवा प्रवचन यांना जाण्याचा, तर काही जणांना संतांकडे जाण्याचा छंद असतो. आधीच्या छंदांपेक्षा हे छंद बरे असले, तरी त्याच्यामुळे होणारी एक हानी, म्हणजे आपण साधना करतो, या भ्रमात ते रहातात. त्यामुळे ईश्‍वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करावा लागतो, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे सात्त्विक छंद असूनही त्यांची साधनेत प्रगती होत नाही. – डॉ. आठवले (२३.१०.२०१३)

Leave a Comment