काही आल्हाददायक गोष्टी परिणामी मृत्यूला कारण ठरतात !

‘काही गोष्टी आल्हाददायक असतात; परंतु परिणामी घातक ठरतात. व्याध हरिणाला पकडण्याकरताच मधुर वाद्य वाजवतो. हरिणाला ते गाणे गोड वाटते; पण ते मृत्यूला कारण होते.’

हिंदु राष्ट्रात असे राज्यकर्ते असतील !

‘अथर्ववेद कांड ७, सूक्त ९२, ऋचा १ मध्ये म्हटले आहे, ‘राष्ट्राचे रक्षण करणारा, राष्ट्र समर्थ करणारा, राष्ट्राला साधन संपन्न करणारा, गुप्त रूपाने साम-दाम-दंड-भेद उपायांद्वारे दुष्ट शक्तींचे निर्मूलन करणारा, अशा प्रकारे उत्तम शासन करणारा, गुणवान, ‘सर्वांना सुख मिळावे’, असा मनापासून विचार करून राज्य करणारा राजा असावा.’

त्रास असणाऱ्या साधकांनो, त्रासामुळे पुनःपुन्हा होणाऱ्या चुकांमुळे निराश होऊ नका !

‘त्रास असणार्‍या साधकांचे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक आवरण सारखे सारखे येतच असते. त्यामुळे बर्‍याचदा अशा साधकांकडून ‘त्याच त्याच चुका पुनःपुन्हा होतात’, असे लक्षात आले आहे. चुका झाल्यावर त्याविषयी सतर्क होऊन चुका होऊ नयेत, यासाठी उपाययोजना काढूनही परत परत त्याच त्याच चुका झाल्यामुळे साधकांना निराशा येते. अशा चुका होण्यामागील मुख्य कारण ‘मन आणि बुद्धी यांवर … Read more

एखाद्या प्रसंगातील कार्यकारणभाव जाणून घेण्यापेक्षा सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधनेत पुढे जायला हवे !

बर्‍याच वेळा साधकांना त्यांच्या भावामुळे स्थुलातून आणि सूक्ष्म स्तरावर अनेक अनुभूती येत असतात. बरेच साधक संतांना याविषयी विचारतात, हे असे का घडले ? तसेच का घडले ? स्वप्नात मला जे दिसले, त्याचे कारण काय ? इत्यादी. या विचारांचा साधकांचे मन आणि त्यांची साधना यांवर परिणाम होतो. आरंभीच्या टप्प्याला एक जिज्ञासू म्हणून या अनुभूतींचे विश्‍लेषण आणि … Read more

अवतारी कार्यात धर्मग्लानी दूर करून सत्धर्म स्थापन करणे, हेच ध्येय असणे

धर्मग्लानी दूर करण्यासाठी अवतारी पुरुष जन्म घेतात. ते दृष्टांचे निर्दालन करून धर्माची पुनर्स्थापना करतात. तेव्हा ते मायेतील संबंध बाजूला ठेवतात. जसे मामा असूनही कृष्णाने कंसाचा वध केला. कौरव-पांडव भाऊ असूनही कौरवांच्या दृष्ट वृत्तीमुळे पांडवांनी त्यांचा नाश केला. अगम्य कर्तृत्व त्या वेळी भारतात सर्वत्र मुसलमानी राज्य असूनही अगम्य क्षात्रतेज युक्त असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील पाच … Read more

राजदंडाचा अंकुश नसल्याने समाजाची स्थिती अराजकाची झाली आहे !

‘मनुष्य हा मूलतः आणि स्वभावतः स्वार्थी, लोभी असतो. त्याच्या वर्तनावर राजदंडाचा अंकुश नसेल, तर तो अनिर्बंध होण्यास विलंब लागत नाही. अशा मनुष्याला नियंत्रित करणे, हे धर्माचे आणि दंडाचे कर्तव्य आहे. जर राजदंडाने ते कार्य पार पाडले नाही, तर समाजात मात्स्य न्याय (मोठा मासा लहान माशाला गिळंकृत करतो.) माजेल.’

हे आदिशक्ति, ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्यासाठी आम्हाला बळ दे !

‘अफझलखानरूपी नराधमाला वधण्यासाठी जशी तू शिवछत्रपतींच्या तलवारीचे तेज बनलीस, तसे भ्रष्टाचार, बलात्कार, धर्मांधता, जात्यंधता, गोहत्या आदी राष्ट्रद्रोही अन् धर्मद्रोही प्रवृत्तींच्या विरोधात संघटित होण्यासाठी आम्हालाही तेज दे ! हिंदु धर्माची कीर्ती जगभर पसरवण्यासाठी जशी तू स्वामी विवेकानंदांच्या पाठीशी राहिलीस, तसे हिंदु धर्म आणि साधना यांचा जगद्व्यापी प्रचार करण्यासाठी आमचीही स्वामिनी बन !! स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बालवयातच देशाच्या … Read more