अवतारी कार्यात धर्मग्लानी दूर करून सत्धर्म स्थापन करणे, हेच ध्येय असणे

धर्मग्लानी दूर करण्यासाठी अवतारी पुरुष जन्म घेतात. ते दृष्टांचे निर्दालन करून धर्माची पुनर्स्थापना करतात. तेव्हा ते मायेतील संबंध बाजूला ठेवतात. जसे मामा असूनही कृष्णाने कंसाचा वध केला. कौरव-पांडव भाऊ असूनही कौरवांच्या दृष्ट वृत्तीमुळे पांडवांनी त्यांचा नाश केला.

अगम्य कर्तृत्व

त्या वेळी भारतात सर्वत्र मुसलमानी राज्य असूनही अगम्य क्षात्रतेज युक्त असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील पाच पातशाह्यांचा नाश करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !

झांशीची राणी लक्ष्मीबाई ‘मै झांशी नही दुंगी !’ असे म्हणत स्वत:च्या दत्तक मुलाला पाठीशी बांधून रणांगणात उतरली आणि तिने इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. शेवटी तिने लढता लढताच मृत्यू स्वीकारला; परंतु जिवंत असतांना तिने झांशीचे राज्य इंग्रजांच्या कह्यात दिले नाही. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !’

थोर पुरुषाचे आत्मबळ

लोकमान्य टिळक यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’ असे म्हटले. ‘मराठा’ आणि ‘केसरी’ या त्यांच्या दोन वृत्तपत्रांतून ते इंग्रज सरकारवर सडेतोड उत्तर देत होते. त्यामुळे त्यांना मंडाले तुरूंगात जावे लागले. याबद्दल त्यांनी म्हटले आहे की, यात भगवंताची वेगळीच इच्छा आहे आणि खरोखरच मंडालेच्या तुरुंगात असतांना त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर आधारित ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला.’

Leave a Comment