भौगोलिक स्थिती मानवाने पालटली आहे
‘देवाने निर्माण केलेली भौगोलिक स्थितीच मानवाने पालटली आहे; म्हणून आज ही वाईट स्थिती आली आहे.’
‘देवाने निर्माण केलेली भौगोलिक स्थितीच मानवाने पालटली आहे; म्हणून आज ही वाईट स्थिती आली आहे.’
कर्म नियंत्रणात असेपर्यंत सुधारणा करणे शक्य असणे ‘एखादी गोष्ट आपल्या नियंत्रणात आहे, तोपर्यंत तिच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीतील सत्य-असत्य आणि परिणाम जाणून कृत्य केले पाहिजे, उदा. अन्न घशातून आत जाण्यापूर्वी त्यावर आपले नियंत्रण पाहिजे. एकदा ते पोटात गेले की, त्यावरील आपले नियंत्रण संपते. बोलण्याचेसुद्धा असेच आहे. आपल्या मुखातून बोल निघेपर्यंत विचार करूनच बोलले पाहिजे. … Read more
काही जणांमध्ये मनाने करणे, अव्यवस्थितपणा, अनावश्यक बोलणे, अकारण मोठ्या आवाजात बोलणे यांसारखे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू प्रबळ असतात. ते त्यांच्या प्रकृतीत इतके मुरलेेले असतात की, त्यांना त्यांची जाणीवही नसते आणि म्हणून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवून त्यांवर मात करणे त्यांना इतरांच्या तुलनेत कठीण जाते. यामुळे त्यांना निराशा येते किंवा प्रक्रिया राबवणेच नको वाटते. … Read more
‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितलेली ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ ही केवळ साधकांसाठीच नव्हे, तर अखिल मानवजातीला भवरोगातून मुक्त करणारी चिरंतन संजीवनी आहे.’
विज्ञानापलीकडे ईश्वराचे ज्ञान आहे. हे जे पहात नाहीत, त्या शास्त्रज्ञांचा समाजाला काही उपयोग नाही.
‘हे सर्व पहातांना वाटते की, जसे श्रीकृष्णाने पुतना आणि श्रीरामाने शूर्पणखा राक्षसींची खरी रूपे, म्हणजे मायावी रूपे उघड केली, तसे परात्पर गुरु डॉ. आठवले हे सध्याच्या निधर्मी राजवट असलेल्या लोकशाहीतील अयोग्य कारभार उघड करत आहेत. ही हिंदु राष्ट्र येण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याची लक्षणे आहेत.’
साधना करतांना गुरूंच्या आज्ञेने सर्व करत गेल्यास स्वतःचे मन आणि बुद्धी यांचा वापर न झाल्याने त्यांचा लय होतो. मनोलय आणि बुद्धीलय होतो. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत याला Disuse Atrophy (वापर न केल्यामुळे होणारा नाश) असे म्हणता येईल. यावरून गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व लक्षात येईल.
बर्याच जणांना आध्यात्मिक ग्रंथ वाचले किंवा कीर्तने वा अध्यात्मावरील प्रवचने ऐकली की, आपल्याला अध्यात्म कळले, असे वाटते. हे खरे अध्यात्म कळणे नव्हे; कारण हे केवळ शब्दांच्या पातळीला असते. अध्यात्मातील ज्ञान जेव्हा आपण जीवनात अनुभवू लागतो, तेव्हा अध्यात्माचा अर्थ आपल्याला खर्या अर्थाने कळायला लागतो. हे खरे अध्यात्म कळणे होय. खरे अध्यात्म कळण्यासाठी साधनाच करावी लागते.
सर्वत्र चैतन्यच भरलेले असून तेच कार्य करते. सर्व सृष्टीच चैतन्याने भारित झालेली आहे. असे असतांना यामध्ये तुम्ही-आम्ही कुठून आलो ? एखाद्याने १० कोटी रुपये मिळवले आणि त्यातील १ लाख रुपये दान केले, तर त्याला दानशूर म्हणतात का ? यावरून आजच्या काळात ‘मोह’ आणि ‘लोभ’ यांनी अंध झालेल्या चोरांचे माहात्म्य वाढत असल्याचे दिसत आहे.
‘पुंडलिक यात्रा करत असतांना त्याला काशीपासून ३ मैल अलीकडे कुक्कुट ऋषींचा आश्रम दिसला. तेथे त्याने मुक्काम केला. तेथे त्याला रात्रीच्या वेळी वर्णाने काळ्याकुट्ट असलेल्या आणि मलीन वस्त्रे परिधान केलेल्या ३ स्त्रिया ऋषींच्या आश्रमात येतांना दिसल्या. त्यांनी रात्रभर ऋषींची सेवा केली आणि सकाळी सडासंमार्जन करून त्या परत जाऊ लागल्या. हे पाहून पुंडलिकाने त्यांना नमस्कार करून विचारले, … Read more