त्रास असणाऱ्या साधकांनो, त्रासामुळे पुनःपुन्हा होणाऱ्या चुकांमुळे निराश होऊ नका !

‘त्रास असणार्‍या साधकांचे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक आवरण सारखे सारखे येतच असते. त्यामुळे बर्‍याचदा अशा साधकांकडून ‘त्याच त्याच चुका पुनःपुन्हा होतात’, असे लक्षात आले आहे. चुका झाल्यावर त्याविषयी सतर्क होऊन चुका होऊ नयेत, यासाठी उपाययोजना काढूनही परत परत त्याच त्याच चुका झाल्यामुळे साधकांना निराशा येते. अशा चुका होण्यामागील मुख्य कारण ‘मन आणि बुद्धी यांवर आवरण येणे’, हे असल्याने साधकांनी निराश होऊ नये. आता चुका होत असल्या, तरी त्याविषयी सतर्कता बाळगून परत परत योग्य उपाययोजना काढल्यामुळे त्याचा चित्तावर संस्कारच होतो. हा संस्कार अनेकदा होत असल्यामुळे पुढे त्रासाचा प्रभाव ओसरला की, तशा प्रकारच्या चुका पुन्हा होणार नाहीत, याची निश्‍चिती बाळगा !’

Leave a Comment