जीवनमुक्तीचे रहस्य

‘निश्‍चययुक्त आत्मतत्त्वात रत रहाणारे (गुरु) जीवनमुक्त असतात.’ (महोपनिषद्, अध्याय ६)

कर्माची फलनिष्पत्ती

‘कर्म कुठले करायचे ?’, ते आपल्या हातात असते. ‘त्याचे फळ केव्हा द्यायचे ?’, हे देवाच्या हातात असते.

भासमान आणि शाश्वत यांची प्रमाणे

अयं प्रपञ्चो मिथ्यैव सत्यं ब्रह्माहमद्वयम् । अत्र प्रमाणं वेदान्ता गुरवोऽनुभवस्तथा ॥ – योगवासिष्ठ, प्रकरण ३, अध्याय २१, श्‍लोक ३५ अर्थ : अनुभवाला येणारा प्रपंच विस्तार, नानात्व (विविधता) हे केवळ भासमान होणारे आहे. केवळ एकमात्र ब्रह्मच सत्य, शाश्‍वत आहे आणि ते आपणच आहोत. याविषयी वेदादी सत्शास्त्रे, गुरु आणि शेवटी स्वतःचा अनुभव हीच प्रमाणे होत.

दैनिक सनातन प्रभातमधील लिखाण वाचतांना ‘चैतन्यामुळे कार्य होत आहे’, असा भाव ठेवा !

‘दैनिक सनातन प्रभातमधील प्रत्येक शब्द परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्याने भारित झालेला आहे. त्यामुळे दैनिक सनातन प्रभात क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज युक्त चैतन्याने भारित झाले आहे. यातील प्रत्येक शब्दाच्या प्रभावाने वाचकावरील रज-तमाचे आवरण निघून जाईल आणि त्याची आत्मोन्नती होईल ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पामुळे आणि त्यांच्यातील चैतन्यामुळे साधकांना अनुभूती येतात. त्या दैनिक सनातन … Read more

ईश्वराने मनुष्याला बनवतांना रचलेली लीला !

ईश्‍वराने मनुष्याला बनवतांना स्वतःचा एक अंश घालून (ईश्‍वरी अंश = आत्मा) आणि लीला रचण्यासाठी त्या आत्म्याभोवती मायेचे (त्रिगुणाचे) आवरण घातलेे. मनुष्य म्हणजे र्ईश्‍वरी अंश + माया. त्याने मनुष्याला त्याच्या आत्म्याभोवती असलेले मायेचे आवरण दूर करून ईश्‍वरस्वरूप (आत्मस्वरूप) हो, असे ध्येय दिले. मनुष्य ईश्‍वरस्वरूप झाल्यावर त्या जिवाची लीला पूर्ण होतेे. सर्व मानव ईश्‍वरस्वरूप झाल्यावर जगत्लीला पूर्ण … Read more

जागरण करून केलेल्या सेवेपेक्षा सकाळी लवकर उठून केलेली सेवा अधिक फलनिष्पत्तीदायी !

‘दिवसभर श्रम झाल्यामुळे निसर्गतःच रात्री शरीर थकते, तसेच मन आणि बुद्धी हेही थकतात. रात्री वातावरणातील वाईट शक्तींचा संचार अधिक असल्यामुळे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक आवरण येण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे जागरण करून सेवा, विशेषतः बौद्धिक सेवा करतांना सेवेत सुचण्याचे प्रमाण आणि सेवेची गती अल्प होते अन् चुका होण्याची शक्यता वाढते. यामुळे सेवेची फलनिष्पत्ती घटते. जागरणाचे … Read more

अध्यात्मात वेडे व्हा !

अध्यात्मात वेडे झाल्यानंतरच शहाणपण येते, म्हणजे देवाचा ध्यास घेऊन साधना केली की, आध्यात्मिक उन्नती होऊन संतपदाकडे वाटचाल होते.’

सध्याच्या कलियुगात चोरांची, चोरांकडून आणि चोरांसाठी अशी लोकशाही असणे

सध्या भारतात लोकशाहीच्या नावाखाली लुटारूंचा धंदा चालू आहे. चोरांची, चोरांकडून आणि चोरांसाठी अशी लोकशाही चालू आहे. काही टक्के लोकांची मते मिळाली की, ते राज्य करतात, उदा. ३० टक्के लोक ७० टक्के लोकांवर राज्य करतात. लोकही तसेच आहेत. पर्याय नसल्याने लोकांना निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या लोकप्रतिनिधींना केवळ मत द्यायचे; म्हणून मत दिले जाते. आज जरी नकारात्मक मतदानपद्धत … Read more

स्वामी विवेकानंदांची शिकवण

सर्व जगाच्या कल्याणासाठी दीपस्तंभ असलेल्या हिंदु धर्माचे तेज संपूर्ण विश्‍वात प्रस्थापित केल्याविना शांत बसू नका !

आश्रमात रहाण्याचे महत्त्व

आश्रमात राहिल्याने आवड-नावड संस्कार घटतो, दुसर्‍याचे ऐकण्याची सवय लागते आणि परेच्छेने वागावे लागते. त्यामुळे मनोलय होण्यास साहाय्य होते.