प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवण्यासाठी प्रयत्नशील रहा !

परिस्थिती प्रतिकूल असल्याची कारणे सांगणारा मनुष्य जीवनात कधी यशस्वी होऊ शकत नाही. याउलट प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवण्यासाठी प्रयत्नशील असणारा मनुष्य जीवनात यशस्वी होतो !

‘आत्म्यामुळेच कार्य होत आहे’, याचे स्मरण ठेवून आत्मानुसंधानात राहिल्यास देवाला अपेक्षित असे कार्य होईल !

‘प्रतिदिन कोणतेही कर्म करतांना आपण स्वतःला, म्हणजेच अहंला महत्त्व देतो. प्रत्यक्षात अहंचे अस्तित्व चैतन्यदायी आत्म्यामुळेच आहे. त्यामुळे खरेतर आत्म्याला महत्त्व द्यायला हवे. आत्म्याला महत्त्व द्यायचे, म्हणजे ‘आत्म्यामुळेच कार्य होत आहे’, याचे स्मरण ठेवून प्रत्येक कृती करायची. अशा रितीने प्रत्येक कृती केल्यास ती कृती ईश्‍वरेच्छेने होईल. यासाठी ‘आत्म्याला आपला मित्र करावे’, म्हणजे त्याला सतत विचारून विचारून … Read more

हिंदु राष्ट्र-संस्थापनेचे कार्य परमनिष्ठेने करा !

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठीचा संदेश ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने एकत्रित आलेल्या हिंदुत्वनिष्ठांना माझा नमस्कार ! सध्या देश आणि काल संक्रमण अवस्थेतून जात आहे. या प्रतिकूल काळात आपल्याला हिंदु राष्ट्र-स्थापनेचे, म्हणजेच धर्मसंस्थापनेचे कार्य करायचे आहे. आपल्या साहाय्याला अत्यल्प धर्मनिष्ठ सहकारी आहेत, तर धर्मशत्रू आणि त्याचे समर्थक सहस्रोंच्या पटींनी आहेत. शत्रूंची अधिक संख्या आणि प्रतिकूल काळ … Read more

प्रार्थनेचा खरा लाभ म्हणजे अहंभाव न्यून होण्यास साहाय्य होणे !

आपल्या प्रारब्धात असेल, तेवढेच देव देतो. साधना न करता सकामातील नुसत्या प्रार्थना कितीही केल्या, तरी आपण मागतो, ते देव देत नाही. असे असतांना प्रार्थना करायची कशाला, तर प्रार्थनेमुळे अहंभाव न्यून होण्यास साहाय्य होते; म्हणून !

प्रश्‍न : भावाच्या पुढे कसे जायचे ?

भावाच्या पुढे अव्यक्त भाव असतो. गुरूंचे रूप समोर असतांना त्यांच्याप्रती भाव ठेवून कार्य करणे, हा ‘व्यक्त भाव’. गुरूंचे रूप समोर नसतांनाही त्याची अनुभूती घेत कार्य करणे, म्हणजे ‘अव्यक्त भाव’. हाच भावाच्या पुढच्या टप्प्याला जाण्याचा मार्ग आहे.

प्रायश्चित्ताने मन वळवले पाहिजे !

मन, आत्मा, इंद्रिये आणि वस्तू यांचे संतुलन अन् संयोग झाला, तर कार्य होते. योगः कर्मसु कौशलम् ।, म्हणजे समत्वरूप योगच कर्मातील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. मनाची शांतता आणि आत्म्याशी संतुलन होणे महत्त्वाचे. मन हे वृत्तीप्रमाणे बनते. त्यामुळे वृत्तीत पालट होणे महत्त्वाचे आहे. प्रायश्‍चित्ताने मन वळवले पाहिजे.

काळाला ईश्वर समजल्यास प्रारब्धावर सहजतेने मात करणे शक्य होत असणे

काळ हा आपल्याला अध्यात्म शिकवणारा उत्तम शिक्षक आहे. तो आपल्यासाठी परिस्थिती, परिणाम, प्रारब्धामुळे येणार्‍या सुख-दुःखाच्या गोष्टी असे सर्व घेऊन येत असतो. काळाला ईश्‍वर समजून सामोरे गेले, तर जीवनातील नित्य घडणार्‍या गोष्टींचे काहीच वाटत नाही. त्यामुळे आपल्याला प्रारब्धावर सहजतेने मात करता येते.

लोकहो, ‘या जगतातील सर्व दृश्य-अदृश्य कार्य हे महान चैतन्यशक्तीद्वारे चालते’, हे जाणा !

‘या जगतातील सर्व दृश्य-अदृश्य कार्य हे महान चैतन्यशक्तीद्वारे चालते; परंतु आपण बहिर्मुख होऊन आवरणाशी संबंध ठेवतो आणि ‘आवरणाद्वारे कार्य चालते’, अशी आपली भावना होते. त्यामुळे सामान्य जनतेची फसगत होत आहे. भौतिक सुखाच्या लालसेमुळे भौतिक सुखात रमणे, भौतिक सुखाची प्राप्ती करणे, यासाठीच सर्व वेळ घालवला जातो. विज्ञान आणि संशोधन हेसुद्धा याच विचारसरणीला पूरक झाले आहे. त्यामुळे … Read more