दैनिक सनातन प्रभातमधील लिखाण वाचतांना ‘चैतन्यामुळे कार्य होत आहे’, असा भाव ठेवा !

‘दैनिक सनातन प्रभातमधील प्रत्येक शब्द परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्याने भारित झालेला आहे. त्यामुळे दैनिक सनातन प्रभात क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज युक्त चैतन्याने भारित झाले आहे. यातील प्रत्येक शब्दाच्या प्रभावाने वाचकावरील रज-तमाचे आवरण निघून जाईल आणि त्याची आत्मोन्नती होईल !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पामुळे आणि त्यांच्यातील चैतन्यामुळे साधकांना अनुभूती येतात. त्या दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध होतात. ‘साधकांकडून होत असलेले धर्मप्रसाराचे कार्य हे त्या साधकांनी केलेले नसून त्यांच्यातील चैतन्यामुळे (जे परात्पर गुरु डॉ. आठवले (गुरु) यांच्या कृपेमुळे प्राप्त) झालेले आहे’, अशा प्रकारे भाव ठेवल्यास वाचणार्‍यांमध्ये ईश्‍वराविषयीचा कृतज्ञताभाव वाढेल; कारण आपल्या सर्वांमध्ये चैतन्य आहे; म्हणून आपण जिवंत आहोत. आपल्यामध्ये चैतन्य नसते, तर आपण मृतवत् झालो असतो. त्यामुळे ‘प्रत्येकाकडून होणारे प्रत्येक कार्य हे चैतन्यामुळेच होत आहे’, याची जाणीव सतत ठेवावी. आपण सतत गुरुस्मरणात राहून कार्य केल्यास ते सुलभ आणि यशस्वी होईल.’

Leave a Comment