सध्याच्या कलियुगात चोरांची, चोरांकडून आणि चोरांसाठी अशी लोकशाही असणे

सध्या भारतात लोकशाहीच्या नावाखाली लुटारूंचा धंदा चालू आहे. चोरांची, चोरांकडून आणि चोरांसाठी अशी लोकशाही चालू आहे. काही टक्के लोकांची मते मिळाली की, ते राज्य करतात, उदा. ३० टक्के लोक ७० टक्के लोकांवर राज्य करतात. लोकही तसेच आहेत. पर्याय नसल्याने लोकांना निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या लोकप्रतिनिधींना केवळ मत द्यायचे; म्हणून मत दिले जाते. आज जरी नकारात्मक मतदानपद्धत चालू झाली असली, तरी तिला फारसा प्रतिसाद नसतो. याला कलियुग म्हणतात. ‘सध्या राजकीय क्षेत्रात सर्वांत अधिक वाईट कोण ?’, याची स्पर्धा चालू आहे.

Leave a Comment