साधनेला आरंभ केल्‍यावर ईश्‍वराला जाणून घ्‍यायची जिज्ञासा असेल, तर प्रथम स्‍वतःला जाणा !

‘साधनेला आरंभ केला की, कुणालाही ईश्‍वराला पहायची, त्‍याला जाणून घ्‍यायची ओढ लागते; पण आपण स्‍वतः स्‍वभावदोष आणि अहंकार यांनी मलीन असतांना आपल्‍याला शुद्ध आणि पवित्र असा ईश्‍वर कसा भेटेल ! ईश्‍वराला जाणून घ्‍यायचे असेल, तर आधी अंतर्मुख होऊन स्‍वतःला जाणले पाहिजे. ‘आपल्‍यात कोणते स्‍वभावदोष आणि अहंचे कोणते पैलू आहेत ?, तसेच आपल्‍यात कोणते गुण वाढवणे आणि निर्माण करणे आवश्‍यक आहे ?’, हे जाणून घेतले पाहिजे. यासाठीच सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अभिनव अशी ‘स्‍वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन, तसेच गुणसंवर्धन प्रक्रिया’ शोधून काढली आहे. ते ही प्रक्रिया साधकांना साधनेच्‍या आरंभी प्रथम प्राधान्‍याने करायला सांगतात. ती केल्‍यानंतर ‘अष्‍टांगसाधने’तील साधनेची अन्‍य ६ अंगे (नामजप, भावजागृती, सत्‍संग, सत्‍सेवा, त्‍याग आणि प्रीती) सहजतेने करता येतात, तसेच आध्‍यात्मिक उन्‍नतीही लवकर होते, असा साधकांचा अनुभव आहे !’

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (२०.६.२०२३)

Leave a Comment