अनंत कोटी ब्रह्मांडांचा पालनकर्ता ईश्वर !

‘कुठे कुटुंबाचे किंवा आपल्या जातीबांधवांचे हित पहाणारे संकुचित वृत्तीचे मानव, तर कुठे अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्राणीमात्रांचे हित सांभाळणारा ईश्‍वर !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी समष्टी साधना आवश्यक !

‘व्यष्टी साधनेत एकाच देवतेची उपासना असते; पण समष्टी साधनेत अनेक देवतांची उपासना असते. लष्करात पायदळ, रणगाडे, हवाईदल, नाविकदल इत्यादी अनेक विभाग असतात. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या समष्टी कार्यात अनेक देवतांची उपासना, यज्ञ-याग इत्यादी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांपेक्षा ‘मला दिसत नाही’, असे प्रांजळपणे कबूल करणारा श्रेष्ठ !

‘मोतीबिंदू झालेल्याला बारीक अक्षर दिसत नाही. कुणी ते बारीक अक्षर वाचून दाखवले, तर मोतीबिंदू झालेला त्याला ‘तेथे अक्षर आहे’, असे तुम्ही खोटेच भासवता आहात’, असे म्हणत नाही. तो म्हणतो, ‘मला बारीक अक्षरे दिसत नाहीत.’ त्याने चष्मा लावल्यावर त्याला बारीक अक्षर वाचता येते. याउलट बुद्धीप्रामाण्यवादी त्यांना मान्य नसणारे ‘सर्व खोटे आहे’, असे म्हणतात. ‘साधनेने सूक्ष्म दृष्टी … Read more

केवळ मनुष्य जन्मातच भगवद़्धामात परत जाण्यासाठीची परमोच्च संधी !

‘आपण परमेश्‍वराचे अंश आहोत; पण काही कारणाने आपण या संसारी जीवनात पडलो आहोत. आता आपल्‍याला अशा रितीने उत्‍क्रांत व्‍हावयाचे आहे की, ज्‍यायोगे आपण भगवद़्‍धामात परत जाऊ शकू. हीच परमोच्‍च संसिद्धी (संधी) होय आणि ती मनुष्‍याला या जीवनात प्राप्‍त करून घेता येते.’ (साभार : आत्‍मसाक्षात्‍काराचे विज्ञान)

‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ हेच आदर्श राष्ट्र !

‘अश्‍लील चित्रपट, ‘पब ’, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांसारख्या गोष्टींना शासनकर्त्यांनी मान्यता दिल्याने राष्ट्रातील जनतेचे चारित्र्य नष्ट होत आहे. ‘रामराज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ आदर्श होते; कारण ती राज्ये चारित्र्यसंपन्न होती. सध्याचे शासनकर्ते हे लक्षात घेऊन ‘चारित्र्यसंपन्न राष्ट्र’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील का ? भावी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चारित्र्य संपन्नच असेल.’ – … Read more

प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध असणे, हे केवळ हिंदु धर्माचे वैशिष्ट्य !

‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा हिंदु धर्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध व्हावी, यासाठी हिंदु धर्मात १४ विद्या आणि ६४ कला या मार्गांनी साधना शिकवता येते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध होते आणि त्यामुळे हिंदु धर्मात आवश्यक ती साधना होणार्‍यांचे प्रमाण अन्य धर्मियांपेक्षा अधिक आहे.’ – सच्चिदानंद … Read more

अहंभाव असलेले आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अहंभावशून्य भगवंत !

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर) रुग्णांना लहान-मोठ्या आजारांतून वाचवतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत साधकांना भवरोगापासून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करतो, तरी तो अहंशून्य असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

हिंदु धर्माचे अद्वितीयत्व !

‘कुठे परधर्मियांवर कुरघोडी करून त्यांच्यावर राज्य करण्याची शिकवण देणारे काही पंथ, तर कुठे ‘सर्वेषाम् अविरोधेण् ।’, अशासारखी सहिष्णुतावादी शिकवण देणारा महान हिंदु धर्म !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेत स्थुलातील चुका सांगण्याचे महत्त्व !

‘साधनेमध्‍ये मनाच्‍या स्‍तरावर होणारी अयोग्‍य विचारप्रक्रिया ही अधिक बाधक असते. अंतर्मुखतेच्‍या अभावामुळे साधकाला स्‍वतःच्‍या चुका कळत नाहीत आणि त्‍या मनाच्‍या स्‍तरावरील चुका असल्‍यामुळे इतरांच्‍या लक्षात येत नाहीत. ही विचारप्रक्रिया अयोग्‍य कृतीच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍त होत असते. त्‍यामुळे या अयोग्‍य कृतीची जाणीव संबंधिताला करून दिल्‍यास त्‍याला त्‍याच्‍या अयोग्‍य विचारप्रक्रियेची जाणीव होण्‍यास साहाय्‍य होते, उदा. एका साधकाच्‍या मनातील … Read more

आध्यात्मिक विकास हाच समर्पक विकास !

तुम्‍ही स्‍वतःचा विकास करण्‍याकरता प्रयत्न करत आहात; पण तुम्‍ही आध्‍यात्मिकरित्‍या विकसित व्‍हा; कारण आध्‍यात्मिक विकास, हाच समर्पक विकास आहे. तुम्‍ही अमेरिकन आणि युरोपियन यांची नक्‍कल करू नका. इंद्रियतृप्‍तीच्‍या (वासनेच्‍या) पायावर आधारलेली अशी संस्‍कृती टिकत नाही. मानवी जीवनाचा खरा दृष्‍टीकोन म्‍हणजे आध्‍यात्मिक दृष्‍टीकोन आहे आणि तो समजून घेण्‍याचा प्रयत्न करा.’ (साभार : आत्‍मसाक्षात्‍काराचे विज्ञान)