विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे सर्वश्रेष्ठत्व !

‘जगातील वैद्य, अभियंता, अधिवक्ता, वास्तूविशारद इत्यादी विविध विषयांतील तज्ञ, तसेच गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान इत्यादी एकही विषय दुसर्‍या विषयासंदर्भात एक वाक्य सांगू शकत नाहीत. फक्त अध्यात्म हा एकच विषय विश्‍वातील सर्व विषयांशी संबंधित त्रिगुण, पंचमहाभूते, तसेच शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती इत्यादींच्या संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ शकतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्वसामर्थ्यवान असूनही भारताने इतिहासात एकाही देशावर आक्रमण न करण्याचे कारण

‘भारत सोडून जगातील इतर सर्वच राष्ट्रांनी दुसर्‍या राष्ट्रांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आपली शक्ती वापरली आहे आणि अजूनही वापरत आहेत. याउलट त्रेता आणि द्वापर या युगांत भारत जगात सर्वसामर्थ्यवान असतांनाही भारताने एकाही देशावर आक्रमण केले नाही. याचे कारण हे की, भारतातील हिंदु धर्मामुळे त्या युगांतही सर्वांचे लक्ष ईश्वरप्राप्तीकडे आणि ऋषीमुनींचे लक्ष ‘१४ विद्या आणि ६४ कला यांच्या … Read more

महत्त्व तर भगवंतालाच आहे !

भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही सेवक । भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही दास । भगवंता, तू श्रेष्ठ आम्ही साधक ।। – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

भाव, श्रद्धा आणि भक्ती

अ. ‘जेवढा वेळ ईश्वराची अनुभूती येते’, ती अवस्था म्हणजे ‘भाव.’ आ. ‘ईश्वर जे करेल, ते योग्यच आहे’, असे वाटणे, म्हणजे ‘श्रद्धा.’ इ. ‘ईश्वराने जे केले, ते योग्यच आहे’, असा विचार करणे, म्हणजे ‘भक्ती.’ – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

परमात्म्याचे होण्यासाठी काय करावे ?

परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अतीदक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस; पण फळ देणारा मी आहे, ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे. ते तुला सर्व रोगांतून मुक्त … Read more

हास्यास्पद साम्यवाद !

‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ या शब्दाकडे आणि ईश्‍वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले