परमात्म्याचे होण्यासाठी काय करावे ?

परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना ? मग तू प्रपंच अतीदक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस; पण फळ देणारा मी आहे, ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे. ते तुला सर्व रोगांतून मुक्त करील; आणि ते औषध जर कोणते असेल, तर ते माझे ‘नाम’ हे होय !

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

Leave a Comment