बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, अध्यात्मात बुद्धीला महत्त्व नाही, तर बुद्धीलयाला महत्त्व आहे, हे प्राथमिक तत्त्व समजून घ्या !

बुद्धीप्रामाण्यवादी बालवाडी किंवा प्राथमिक शाळेत प्रवेश देतांना वय पहातात. अध्यात्मात वयानुसार नाही, तर पात्रतेनुसार शिक्षण मिळते, उदा कु. वैभवी भोवर (वय १६ वर्षे), सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (वय ५१ वर्षे) आणि डॉ. अजय जोशी (वय ५८ वर्षे) हे आज एकाच दिवशी ६१ टक्के पातळीचे झाले. एवढेच नव्हे, तर शाळेत कधीही न गेलेला अन् शारीरिकदृष्ट्या अपंग … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, स्वतःचे हसे करून घेऊ नका !

एखाद्या वैद्याने संगणकाबद्दल किंवा भूगर्भशास्त्राबद्दल बोलणे किंवा जमिनीने हिमालयाची उंची मोजणे जसे हास्यास्पद होईल, तसेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी अध्यात्माबद्दल बोलणे हास्यास्पद होते ! – डॉ. आठवले (३१.८.२०१३)

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, स्वतःचा अहं वाढू देऊ नका !

अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना अहंभाव नसतो. त्यामुळे त्यांची बुद्धी विश्‍वबुद्धीशी एकरूप होऊन त्यांना स्थूल आणि सूक्ष्म, म्हणजे पंचज्ञानेंद्रियांना समजणारे आणि त्यांच्या पलिकडील अशा दोन्ही प्रकारचे ज्ञान होते. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मला सर्व कळते हा अहंभाव असतो. त्यामुळे त्यांना एका विषयाचेही परिपूर्ण ज्ञान नसते. या अहंभावामुळेच त्यांची अधोगती होते. – डॉ. आठवले (३१.८.२०१३)

सौंदर्य वर्धनालयात (ब्युटीपार्लरमध्ये) जाणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

१. सौंदर्य वर्धनालयात जाणे म्हणजे स्थूलदेहात अडकणे आणि दुसर्‍यांनी आपल्याला सुंदर म्हणावे, अशी बहिर्मुखता निर्माण होणे २. मनोरुग्ण स्थूलदेहात अडकू नयेत; म्हणून मी माझ्या चिकित्सालयात Beautiparlour for Mind म्हणजे मनाचे सौंदर्य वर्धनालय असा फलक लावला होता. ३. उपचारामुळे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन झाले की, व्यक्तीचे स्वतःच्या चेहर्‍याकडे विशेष लक्ष जात नाही. ४. भावामुळे सौंदर्य … Read more

साधनेतील कठीणता

म्हातारपणी किंवा थकवा आल्यावर पाऊल उचलून उंबरठ्यावरून पुढे जाणे कठीण होते (हे मी अनुभवतो.), तर एकेका लोकात पावले टाकून पुढच्या पुढच्या लोकांत जाऊन सप्तलोकांच्या पलिकडे, म्हणजे निर्गुणात जाणे किती कठीण असेल ! – डॉ. आठवले (चैत्र शुक्ल पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११५ (२३.४.२०१३))

निराधार हिंदूंकडून साधना करवून घेणे, हाच त्यांच्या सर्व समस्यांवरील एकमेव उपाय !

हल्लीचे बहुसंख्य धर्माचार्य मिरवणुका, पाद्यपूजा, सन्मान यांशिवाय काय करतात ? बहुतेक कीर्तनकार आणि प्रवचनकार केवळ कीर्तने आणि प्रवचने करतात. त्यामुळे कितीजण साधना करायला लागले, याचा ते विचारही करत नाहीत. मुसलमानांना मुल्ला-मौलवींचा आणि ख्रिस्तींना फादरचा आधार वाटतो. तसा हिंदूंना कोणाचाही आधार वाटत नाही. काही धर्माचार्यांचा हिंदूंना आधार वाटला असता; पण तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी त्यांच्याहीबद्दल हिंदूंच्या मनात विकल्प … Read more

विज्ञानाचे थिटेपण आणि साधनेचे महत्त्व

विज्ञानाला कोणत्याही गोष्टीच्या कार्यकारणभावातील फक्त वरवरचा आणि वर्तमानकाळातील, म्हणजे फारतर १ लक्षांश एवढाच भाग कळतो. याचे कारण हे की, विज्ञानाला आधीचे जन्म, प्रारब्ध इत्यादी काही ज्ञात नसते. त्यामुळे विज्ञानाने सांगितलेली उपाययोजना फारच वरवरची असते. ती मुळापर्यंत जाऊन उपाय करू शकत नाही. एखाद्याला क्षयरोगामुळे खोकला येत असला, तर त्याला केवळ खोकल्याचे औषध देणे जितके हास्यास्पद ठरेल, … Read more

राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात तळमळ अत्यावश्यक !

हिंदु जनजागृती समितीतर्फे दुसरे अखिल भारतीय हिंदु अधिवेशन रामनाथी, गोवा येथे ६ ते १० जून २०१३ या काळात आयोजित करण्यात आले होते. त्यांतील बहुतेक प्रतिनिधी साधना करणारे किंवा वाईट शक्तींच्या त्रासांवर उपाय करणारे नव्हते, तरीही त्यांचा उत्साह आणि एकमेकांबद्दलचा प्रेमभाव भरभरून वहात होता. त्यामुळे अधिवेशनात उत्साह वाटत होता. याउलट अधिवेशनासाठी उत्तर भारतातून आलेल्या सनातन संस्थेच्या … Read more

सांप्रदायिक साधनेने जलद प्रगती न होण्याचे कारण

व्हिटामिन ए, बी, सी, डी यांपैकी, तसेच लोह, कॅल्शियम इत्यादी धातूंपैकी जे कमी असेल, ते घ्यायला आधुनिक वैद्य (डॉक्टर) सांगतात. तसेच ज्या देवतेचे तत्त्व कमी असेल किंवा ज्या साधनामार्गाने साधना करणे आवश्यक असेल, त्यानुसार उपासना करायची असते. हे ज्ञात नसल्याने सांप्रदायिक साधना करणारे सर्वजण एकच उपासना करतात. असे करणे हे एखाद्या आधुनिक वैद्यांनी सर्व रुग्णांना … Read more

साधकांनो, उपाय गांभीर्याने करा !

माझा महामृत्यूयोग, साधकांना होणारे त्रास, हिंदु राष्ट्राची स्थापना यांसंदर्भात विविध संतांनी सांगितलेले सर्व उपाय मी करतो. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष ८, कलियुग वर्ष ५११५ (१७.६.२०१३)