भक्तांना आरसे महाल अनावश्यक !

पूर्वीच्या काळी राजवाड्यात आरसे महाल असत. महालात व्यक्ती कुठेही असली, तरी ती दिसते. त्यामुळे ती सर्वत्र आहे, असे दिसायचे. भक्तांना आरसे महाल तयार करावा लागत नाही; कारण त्यांना देव केवळ सर्वत्रच नाही, तर स्वतःमध्येही दिसतो. – डॉ. आठवले (२८.१०.२०१३)

प्रार्थनेचे टप्पे

१. अहं न्यून करण्यासाठी प्रार्थना आवश्यक असते. प्रार्थना करतांना काहीतरी स्वेच्छा असते. अगदी विश्‍वासाठी प्रार्थना केली, तरी तिच्यात स्वेच्छा असते. २. पुढे ईश्‍वरेच्छेवर सगळे सोडल्यावर प्रार्थनेऐवजी मनाला निर्विचार स्थिती आणि शांती अनुभवता येते. – डॉ. आठवले (आषाढ कृष्ण पक्ष ११, कलियुग वर्ष ५११५ (२.८.२०१३))

कर्तेपण श्रीकृष्णाला अर्पण करणे आवश्यक !

श्रीकृष्ण माझ्या रूपात अनुभूती देतो. साधकांना वाटते, प.पू. डॉक्टरांमुळे अनुभूती आल्या. यातून शिकण्यासारखे हे की, श्रीकृष्णाने अनुभूती दिल्या, तरी तो कर्तेपण मला देतो. साधकांनीही हे लक्षात ठेवून प्रत्येक कृतीचे कर्तेपण श्रीकृष्णाला अर्पण केले पाहिजे. – डॉ. आठवले (वैशाख शुक्ल पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११५ (२२.५.२०१३))

मायेतील सूक्ष्मातील कळणेही निरर्थक असणे

काही जणांना वनस्पती, पशू-पक्षी, इतकेच काय, तर निर्जीव वस्तूही काय बोलतात, हे कळते. ते आयुष्यभर त्यातच रममाण होतात. हा झाला सिद्धीचा एक प्रकार. मायेतील स्थुलातील कळणे जसे ईश्‍वरप्राप्तीच्या संदर्भात निरर्थक असते, तसेच मायेतील सूक्ष्मातील कळणेही निरर्थक असते. – डॉ. आठवले (चैत्र शुक्ल पक्ष दशमी, कलियुग वर्ष ५११५ (२१.४.२०१३))

स्थुलातून पूजा, साष्टांग नमस्कार इत्यादी कृती करण्यापेक्षा त्या मनाने केल्यास अधिक लाभ होणे

याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. स्थुलातून कृती करत असतांना देहाकडेही लक्ष द्यावे लागते. त्याच कृती मनाने करतांना तसे लक्ष द्यावे लागत नाही. त्यामुळे त्या कृती एकाग्रतेने आणि भावपूर्ण करणे सुलभ होते. २. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे. सूक्ष्मतम ईश्‍वराकडे जाण्यासाठी साधना सूक्ष्मातून करणे अधिक महत्त्वाचे आहे. – डॉ. आठवले (वैशाख अमावास्या, कलियुग वर्ष ५११५ (८.६.२०१३))

सात्त्विक छंद जोपासण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने तन-मन-धनाचा त्याग करणे म्हणजे साधना !

काही जणांना क्रिकेटचा, काही जणांना गाण्याचा, काही जणांना नृत्याचा, काही जणांना फिरायला बाहेरगावी जाण्याचा, असे विविध छंद असतात. त्याचप्रमाणे काही जणांना तीर्थक्षेत्री जाण्याचा, काही जणांना भजन, कीर्तन किंवा प्रवचन यांना जाण्याचा, तर काही जणांना संतांकडे जाण्याचा छंद असतो. आधीच्या छंदांपेक्षा हे छंद बरे असले, तरी त्याच्यामुळे होणारी एक हानी, म्हणजे आपण साधना करतो, या भ्रमात … Read more

…आणि माझा अहं अल्प झाला !

आतापर्यंत डॉ. आठवले यांनी सनातन संस्था स्थापन केली, अशी संस्थेची ओळख करून दिली जायची. आता सनातन संस्थेचे डॉ. आठवले, असे मला ओळखतात ! – डॉ. आठवले (वैशाख कृष्ण पक्ष दशमी, कलियुग वर्ष ५११५ (३.६.२०१३))

मंदिरांतील पुजार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

मंदिरांतील पुजार्‍यांनी आपण देवाचे भक्त आहोत आणि मंदिरात येणार्‍यांना भक्ती करायला शिकवणे, ही आपली साधना आहे, या दृष्टीने आपल्या पुजारीपणाकडे पाहिले पाहिजे. असे केले, तरच समाजाला पुजारी आपले वाटतील आणि त्यांचीही प्रगती होईल. – डॉ. आठवले (२३.१.२०१४)

ईश्‍वर सर्वव्यापी असतांना फक्त स्वतःचा विचार करत गेल्याने मानवाची होत गेलेली परमावधीची अधोगती !

१. पूर्वी सर्व गाववाले एक असत. २. पुढे फक्त एकत्र कुटुंबातील सर्वजण एक असत. ३. आता एका कुटुंबातील पती-पत्नीही घटस्फोट घेतात आणि मुलेही आई-वडिलांना विचारत नाहीत ! या स्थितीत राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सर्वांनी एकत्र येणे किती कठीण आहे, हे लक्षात येईल. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे साधना करून सर्वांबद्दल प्रीती निर्माण करणे. – … Read more

शांतीच्या लहरी संदर्भात स्पष्टीकरण

सनातनच्या ग्रंथांतील सूक्ष्म-परिक्षणात काही ठिकाणी शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो. शांती निर्गुणाशी संबंधित असतांना शांतीच्या लहरी कशा असतील ?, असे काही जणांना वाटते. ते योग्यही आहे. प्रत्यक्षात निर्गुणाच्या स्थितीला गेल्यावर, म्हणजे अद्वैतात गेल्यावर शांतीची अनुभूती आली, असे सांगणाराही उरत नाही. शांतीच्या लहरी, असा उल्लेख असतो, तो ३० टक्क्यांहून अधिक शांती अनुभवणार्‍या साधकांना आलेला अनुभव असतो. … Read more