राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात तळमळ अत्यावश्यक !

हिंदु जनजागृती समितीतर्फे दुसरे अखिल भारतीय हिंदु अधिवेशन रामनाथी, गोवा येथे ६ ते १० जून २०१३ या काळात आयोजित करण्यात आले होते. त्यांतील बहुतेक प्रतिनिधी साधना करणारे किंवा वाईट शक्तींच्या त्रासांवर उपाय करणारे नव्हते, तरीही त्यांचा उत्साह आणि एकमेकांबद्दलचा प्रेमभाव भरभरून वहात होता. त्यामुळे अधिवेशनात उत्साह वाटत होता. याउलट अधिवेशनासाठी उत्तर भारतातून आलेल्या सनातन संस्थेच्या साधकांची आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची स्थिती होती आणि त्याचे कारण होते, तळमळीचा अभाव ! अशांना व्यष्टी साधना करण्यास सांगावी लागली. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष ४, कलियुग वर्ष ५११५ (१३.६.२०१३))

Leave a Comment