परमेश्वराला जिंकणे

अध्यात्मात ‘जिव्हाळा’ पुष्कळ महत्त्वाचा आहे. प्रत्येक जिवाला लळा लावणे, म्हणजे जिव्हाळा. जिव्हाळ्यातून प्रत्यक्ष परमेश्वरालाही जिंकता येते. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

योग्यांची ‘ब्रह्मदृष्टी’

केवळ शाश्वताला पहाण्याच्या दृष्टीला ‘ब्रह्मदृष्टी’ म्हणतात. ती एकत्वात स्थिर झालेली असते. अशी दृष्टी योग्यांची असते. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

भावामुळे कर्मसिद्धांत लागू होत नाही

साधकामध्ये ‘भाव’ असला की, प्रत्येक जिवासाठी कार्यरत असणारा कर्मसिद्धांत त्याला लागू होत नाही; कारण भावामुळे कर्म ‘अकर्म’ होते; म्हणून ‘भाव’ महत्त्वाचा ! भाव हा कर्माला पुसण्याचा ‘खोडरबर’ आहे. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

संतांचा मायेकडे पहाण्याचा दृष्टीकोन !

तुम्ही ‘जीवन’ म्हणून आयुष्याकडे पहाता, तर संत ‘जीव-न’ म्हणजे ‘जीव नसलेली, माया नसलेली गोष्ट’ म्हणून आयुष्याकडे पहातात; म्हणून ते आनंदी असतात. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

प्रतिदिन साधनेच्या प्रयत्नांत सातत्य असणे महत्त्वाचे आहे !

प्रत्येक साधकाने वर्षाच्या शेवटी गुरुपौर्णिमेला मनाची घालमेल करून घेण्यापेक्षा, रोज रात्री स्वतःच्या साधनेचा आढावा घेतला पाहिजे. आपल्या साधनेतील उणिवा रोजच्या रोज दूर करून प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे हाच खरा गुरुमंत्र आहे. असे रोजचे आत्मपरीक्षण केले, तरच ईश्वराच्या प्रगतीपुस्तकात आपली चांगल्या गुणांनी नोंद होईल. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

मोक्षमार्गातील शिकवणारे विविध टप्पे

साधक, शिष्य, संत, गुरु आणि सद्गुरु हे सर्व जण मोक्षप्राप्तीच्या ध्येयातील आपल्याला शिकवणारे टप्पे आहेत. आपल्या साधनाप्रवासात ते विविध टप्प्यांना आपल्या संपर्कात येतात; पण आपले मुख्य ध्येय मात्र ईश्‍वरप्राप्तीच आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

अध्यात्माची चालती-बोलती शाळा !

‘आपल्या समवेत असलेला सहसाधक म्हणजे त्याच्याकडून शिकण्याची देवाने दिलेली एक संधी आहे’, असे समजावे. बर्‍याचदा तो साधकच आपला गुरु बनतो. त्याच्याकडून शिकण्यासारखे अनेक गुण देव आपल्याला लक्षात आणून देतो. आपण आपल्या सहसाधकाकडे त्याच भावाने पहावे. देवाने एखाद्या साधकाला आपल्या संपर्कात पाठवले आहे, तर प्रसंगी त्याच्या साधनेचे संपूर्ण दायित्वही आपल्याला घेता आले पाहिजे. ‘आपणच एकमेकांचे उत्तरदायी … Read more

देवाला स्मरून केलेली प्रत्येक उत्तम कृती, म्हणजे परिपूर्ण सेवा असते आणि परिपूर्ण सेवेतूनच साधनेची अधिक फलनिष्पत्ती प्राप्त होते !

साधकांनी सेवा करून उत्तरदायी साधकांचे मन जिंकायला हवे. उत्तरदायी साधकांनी पुन्हा सेवा देतांना म्हटले पाहिजे, ‘‘अरे, हा साधक ना ! पुष्कळ चांगली सेवा करतो. त्याने केलेली सेवा मला परत पहावी लागत नाही.’’ अशा प्रकारे उत्तरदायी साधकांनी आपल्याला १०० टक्के गुण देऊन सेवारूपी परीक्षेत उत्तीर्ण केले पाहिजे. सेवेतील फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी दुसर्‍या दिवसाच्या सेवेचे ध्येय आदल्या दिवशीच … Read more

परिपूर्ण सेवेचा ध्यास कसा असावा ?

‘साधकांनी एखादी कृती केली आणि अमूक इतके घंटे सेवा झाली, म्हणजे सेवा झाली’, असे होत नाही. हे काम झाले. तेव्हा साधक ‘मी साधना केली किंवा सेवा केली’, असे म्हणू शकत नाही. सेवा करण्याचा ध्यासच लागायला हवा. ‘एखादी कृती केल्यावर त्या माध्यमातून माझी साधना झाली का ?’, याचे सतत चिंतन करायला हवे. असे चिंतन करण्याची स्वतःला … Read more