साधकांनी सेवा करून उत्तरदायी साधकांचे मन जिंकायला हवे. उत्तरदायी साधकांनी पुन्हा सेवा देतांना म्हटले पाहिजे, ‘‘अरे, हा साधक ना ! पुष्कळ चांगली सेवा करतो. त्याने केलेली सेवा मला परत पहावी लागत नाही.’’ अशा प्रकारे उत्तरदायी साधकांनी आपल्याला १०० टक्के गुण देऊन सेवारूपी परीक्षेत उत्तीर्ण केले पाहिजे. सेवेतील फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी दुसर्या दिवसाच्या सेवेचे ध्येय आदल्या दिवशीच ठरवून घ्यावे आणि तसे प्रयत्न करावेत. सेवा ही परिपूर्ण हवी. देवाला स्मरून केलेली प्रत्येक उत्तम कृती, म्हणजे परिपूर्ण सेवा होय. परिपूर्ण सेवेतूनच साधनेची अधिक फलनिष्पत्ती प्राप्त होते.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !