‘सद्गुरु’ पदाचे तत्त्वज्ञान

‘सद्गुरु’ म्हणजे एक आध्यात्मिक पद नसून त्या त्या वेळी त्या त्या स्थितीनुसार काळाला अनुसरून केलेला समष्टीच्या कल्याणाचा विचार आणि त्यानुसार केलेली कृती असते. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

स्थळ जरी बदलले, तरी साधना तितक्याच निष्ठेने केली पाहिजे.

काळानुसार साधना करण्याच्या प्रक्रियेत फरक पडतो. वर्तमानात कधी व्यष्टी साधनेला महत्त्व येते, तर कधी समष्टी साधनेला महत्त्व येते. येथे अखंड अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे आहे. कधी कौटुंबिक जीवन जगत घरी राहून साधना करावी लागते, तर कधी कुटुंबियांच्या समवेत न रहाता आश्रमजीवन स्वीकारून समष्टी साधना करावी लागते. स्थळामध्ये जरी भेद झाला, तरीही साधनेच्या प्रक्रियेत भेद होता कामा … Read more

साधनेत परिस्थिती, काळ आणि समष्टीचा विचार करायला हवा !

‘काळाला धरून, समष्टीला अनुसरून आणि परिस्थितीनुरूप आपले विचार असायला हवेत. नेहमी एकाच सूत्रावर अडून चालत नाही. ‘परिस्थिती साधनेच्या दृष्टीने कशी हाताळायची ?’, हे लक्षात येत नसेल, तर उन्नतांना विचारून घ्यावे, नाहीतर संघर्ष करण्यातच आपली साधना वाया जाते. -– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘साधेपणा’ हीच आपली श्रीमंती !

‘आपला साधेपणा’ हीच आपली श्रीमंती आहे; कारण साधेपणात अहंकार नसल्याने त्यात देवपण असते आणि देवाला या जगात काय न्यून आहे ? – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

कर्म करतांना चूक झाल्यास क्षमायाचना करावी !

काही कारणामुळे आपल्या हातून कर्म करतांना चूक झाल्यास ईश्वराच्या चरणी क्षमायाचना करावी. नंतर ‘ते कर्म योग्य पद्धतीने करत आहे’, असा भाव ठेवावा. यामुळे चित्तावर योग्य कर्म करण्याचा संस्कार होतो. कर्म करतांना आपल्या समवेत असणार्‍या व्यक्तींचीही प्रत्यक्ष क्षमा मागावी. आपले कर्म साक्षात् ईश्वर पहात असतो. आपण असे केलेले ईश्वराला आवडते. आपण असे करत गेल्यास एक दिवस … Read more

स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा !

अ.स्वेच्छेप्रमाणे वागलो, तर अध्यात्मात एकाच पातळीला अडकून राहू. आ.परेच्छेने वागलो, तर दुसर्‍यांचे ऐकता ऐकता एवढे नम्र होऊन जाऊ की, यातून अहंच्या लयाचाही आनंद घेऊ शकू. इ.ईश्वरेच्छेने वागू लागलो, तर आपण देवाचेच झाल्याने आपोआपच विश्वव्यापक होऊन जाऊ. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

अंतर्बाह्य एकरूपता म्हणजे देवाला सर्वत्र आणि सर्वांमध्ये पहाणे

आपल्या आतही देवाला पहावे, तसेच त्याच पद्धतीने बाहेरही देवाला पहावे. ‘देव आणि केवळ मी’, असे न पहाता देवाला सर्वत्र आणि सर्वांमध्ये पहावे. यालाच ‘अंतर्बाह्य एकरूपता येणे’, असे म्हणतात. अशा गोष्टींचा सराव केला की, आपोआपच मन आणि बुद्धी त्या त्या गोष्टीशी तादात्म्य पावू लागते आणि मग साधनेचा खरा आनंद मिळू लागतो. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल … Read more

सेवा परिपूर्ण होण्यासाठी देवाला प्रार्थना करावी !

भावावस्थेत कधी कधी आपण पुष्कळ काही एकाच वेळी करायला जातो. हा एक प्रकारचा उतावीळपणाच आहे. अशा वेळी देवाला प्रार्थना करावी, ‘देवा, या क्षणाला माझ्या आणि सेवेच्या दृष्टीने जे आवश्यक आहे, तेच तू माझ्याकडून प्राधान्याने परिपूर्ण करून घे.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व !

‘आत्म्याचा रंग निळा आहे. अग्निचाही मूळ रंग निळा आहे. आत्मा ही एक ऊर्जा आहे. श्रीविष्णूचाही रंग निळा आहे. ब्रह्मांडाची स्थिती समतोल राखण्याचे कार्य महाविष्णु करतो. आत्मा जर अविनाशी आहे, तर त्यातील विष्णूतत्त्वाशी एकरूप होतांना आपल्यालाही आपल्या आत्मप्रकाशाशी अनुसंधान जोडावे लागेल. यासाठी आपल्याच अंतर्मनाशी आपल्याला एकरूप व्हावे लागेल. यासाठी आपल्याला तीव्र साधना करून स्वभावदोष आणि अहं … Read more

मन सतत सकारात्मक आणि आनंदी ठेवण्याचे महत्त्व

आपण आपल्या अडचणी एखाद्या व्यक्तीला जेव्हा मनमोकळेपणाने सांगतो, तेव्हा माणुसकीच्या नात्यानेही त्या व्यक्तीशी आपली जवळीक वाढते. त्या व्यक्तीकडून आपल्याला शिकायला मिळते. आपण शिकल्यावर आपल्या आनंदात वाढ होते. आपले मन सतत सकारात्मक आणि आनंदी राहिले, तर जीवनात साधूसंतांची कृपा प्राप्त करणे आणि ईश्वर मिळवणे सोपे जाते. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ