‘साधकांनी एखादी कृती केली आणि अमूक इतके घंटे सेवा झाली, म्हणजे सेवा झाली’, असे होत नाही. हे काम झाले. तेव्हा साधक ‘मी साधना केली किंवा सेवा केली’, असे म्हणू शकत नाही. सेवा करण्याचा ध्यासच लागायला हवा. ‘एखादी कृती केल्यावर त्या माध्यमातून माझी साधना झाली का ?’, याचे सतत चिंतन करायला हवे. असे चिंतन करण्याची स्वतःला सवयच लावून घेतली पाहिजे. प्रत्येक कृती साधनेच्या स्तरावर केली, तरच ती खर्या अर्थाने सेवा झाली. ‘आज माझी किती टक्के सेवा साधनेच्या स्तरावर झाली ?’, असा विचार करावा. परिपूर्ण सेवेचे १०० टक्के गुण असे धरले, तर सेवेचा आढावा घेतांना मनाला विचारायचे, ‘तुला सेवा करतांना किती टक्के गुण मिळाले ?’ मनाला गुण देतांना पुढील सर्व गोष्टी विचारात घ्याव्यात.
१. मी सेवा करतांना प्रार्थना केली का ?
२. माझे सेवेत लक्ष होते का ?
३. मी सेवा आनंदाने केली का ?
४. मी आज केलेल्या सेवेतून काहीतरी शिकलो का ?
५. मी ‘सेवा केल्यावर परत ती सेवा कुणाला तरी करायला लागू नये’, अशी, म्हणजेच ती सेवा परिपूर्ण केली ना ?
६. ‘माझ्याकडून सेवा स्वेच्छेने होत नाही ना ?’, असेही पहावे.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !