‘आपल्या समवेत असलेला सहसाधक म्हणजे त्याच्याकडून शिकण्याची देवाने दिलेली एक संधी आहे’, असे समजावे. बर्याचदा तो साधकच आपला गुरु बनतो. त्याच्याकडून शिकण्यासारखे अनेक गुण देव आपल्याला लक्षात आणून देतो. आपण आपल्या सहसाधकाकडे त्याच भावाने पहावे. देवाने एखाद्या साधकाला आपल्या संपर्कात पाठवले आहे, तर प्रसंगी त्याच्या साधनेचे संपूर्ण दायित्वही आपल्याला घेता आले पाहिजे. ‘आपणच एकमेकांचे उत्तरदायी साधक आहोत’, असा आपला भाव हवा, तरच आपण कुठेही गेलो, तरी ती एक अध्यात्माची चालती-बोलती शाळाच होऊ शकते. असे झाले की, प्रगती कुठेही होऊ शकते.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
खरा अभ्यास !
भक्ताच्या निर्विचार अवस्थेत देव त्याचा विचार करतो.